Last Updated on 12 Sep 2022 4:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीची आकडेवारी
मुंबई । राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे ३० जिल्हे व ३८५ गावे प्रभावित झाली असून 117 तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. 20 हजार 866 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे 318 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर 5806 प्राणी दगावले आहेत. 44 घरांचे पूर्णत: तर 3 हजार 540 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मुंबई (कांजूरमार्ग – 1, घाटकोपर – १) – 2, रायगड – १, सांगली – 1 अशी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण 4 पथके तैनात आहेत. तर नांदेड – 1, गडचिरोली – 1 अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) तुकड्या तैनात केल्या आहेत.
मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात येत आहे.








































































