Last Updated on 13 Dec 2021 4:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे ।
सामान्यांना न्याय मिळावा या हेतूने व शिवरायांचे म्हणजे रयतेचे राज्य स्थापन करण्यासाठी रयत क्रांती संघटना पुरस्कृत राजकीय रयत क्रांती पक्षाची स्थापना करत असल्याची माहिती आ.सदाभाऊ खोत यांनी दिली.या पक्षाची अधिकृत घोषणा रविवारी (दि. १२) सकाळी १० वाजता पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रायरेश्वर या किल्यावरून पक्षाचे अध्यक्ष सागर सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
हेही वाचा…
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे
संसदीय लोकशाहीमध्ये रयतेचे राज्य यावे ही अपेक्षा होती. मात्र या शासनप्रणालीत रयतच दुबळी राहिली. पण राज्यकर्ते व प्रशासन म्हणजेच शासन व प्रशासन मात्र गब्बर झाले. हे शिवरायांच्या स्वराज्याला अभिप्रेत नव्हते. याला अनेक कारणे आहेत. प्रस्थापित व्यवस्थेत रयतेला अपेक्षित पक्ष असा शिवरायांच्या स्वराज्यासारखा न्याय मिळाला नाही. म्हणून राजेशाहीत छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य निर्माण केले. याचा अभ्यास अखंड जग करत आहे. परंतु शिवरायांच्या भारत भूमीमध्ये रयतेचे राज्य स्थापन झाल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे गोरगरीब जनतेला न्याय देण्याकरिता रयत क्रांती पक्ष काम करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.











































































