Last Updated on 16 Nov 2021 12:00 AM by Sanjay Patil/Adhorekhit
इंग्रजांच्या काळापासून चालत आलेला नियम आता बदलणार
सूर्यास्तानंतर हत्या,आत्महत्या,बलात्कार या घटनांच्या वेळी शवविच्छेदन करता नाही येणार
नवी दिल्ली |
यापुढे सूर्यास्तानंतरही पोस्टमॉर्टेम (शवविच्छेदन) करण्यास परवानगी देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी ही माहिती दिली आहे.स्वतंत्र भारताच्या इतिहासात असा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला असून इंग्रजांच्या काळापासून चालत आलेला नियम आता बदलण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
इंग्रजांच्या काळात शवविच्छेदनाबाबत एक नियम करण्यात आला होता. या नियमानुसार भारतात पोस्टमॉर्टेम करण्यासाठी वेळ निश्चित करण्यात आली होती. या नियमानुसार सूर्योदय ते सूर्यास्त याच कालावधीत पोस्टमॉर्टेम करायला परवानगी देण्यात आली होती.त्यामुळे कुठल्याही परिस्थितीती सूर्यास्तानंतर पोस्टमॉर्टेम होत नसत.
मात्र त्यामुळे अनेक पोस्टमॉर्टेमला उशीर होत असे आणि त्यासाठी प्रक्रिया थांबवून ठेवावी लागत असे.मोदी सरकारने या नियमात आता बदल केला असून सूर्यास्तानंतरही पोस्टमॉर्टेम करायला परवानगी दिली आहे.
यापुर्वी देशात सूर्यास्तानंतर शवविच्छेदन करण्याची परवानगी नव्हती. आता या निर्णयानुसार केंद्रीय आरोग्य मंत्री मांडविया म्हणाले की,ज्या रुग्णालयात रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करण्याची सुविधा आहे, त्या रुग्णालयात आता सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता येणार आहे. या निर्णयामुळे अवयवदानासाठीची प्रक्रिया सुलभ आणि वेळेत पूर्ण होण्यास मदत नाही. रात्री पोस्टमार्टम करण्यासाठीचं तंत्रज्ञानही आता उपलब्ध झाल्याने देशभरातल्या हॉस्पिटलमध्ये ही प्रक्रिया सूर्यास्तानंतरही पार पाडली जाणार आहे.
केंद्र सरकारने या विषयी अधिक माहिती देताना सांगितले,काही मृतदेहाचे शवविच्छेदन रात्री करता येणार नाही जर हत्या,आत्महत्या,बलात्कार या घटनांच्या वेळी शवविच्छेदन करता येणार नाही.सरकारने आपल्या नव्या निर्णयासंबंधी संबंधित मंत्रालय आणि विभाग, राज्य सरकारला या विषयी माहिती दिली आहे.











































































