Last Updated on 23 Mar 2025 9:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली : मरळनाथपूर (ता. वाळवा) येथील विमल कृष्णा खोत (वय ५८) यांचे शनिवार दिनांक २२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले,त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी मरळनाथपूर येथे त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या मरळनाथपूर गावचे माजी सरपंच कृष्णा खोत यांच्या पत्नी व मुंबई भाजपाचे सचिव रवींद्र खोत यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात,एक भाऊ,बहीण, पती, विवाहित एक मुलगा,तीन मुली, सुन नातवंडे,जावई, असा परिवार आहे.








































































