Last Updated on 30 Jan 2025 8:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूर : उरुण येथील पोलीस क्रिडांगणावर दि हॉकी सांगली असोसिएशन व हॉकी महाराष्ट्र असोसिएशन यांच्यावतीने निशिकांत दादा ६ व्या सुवर्ण चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये आजच्या झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई पोर्ट ऑथॉरिटी स्पोर्ट्स क्लब संघाने महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूर संघाचा २-० गोलनी पराभव करत या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.
अंतिम सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघाकडून आक्रमक खेळ केला गेला मात्र कोणालाही गोल करता आला नाही. उत्तरार्धात ५० व्या मिनिटास मुंबई पोट संघास मिळालेल्या पेनल्ट्री कॉर्नरवर नवीन केरकट्टा याने गोल करत सामन्यात एक गोलची आघाडी घेतली. त्यानंतर ५७ व्या मिनिटास मुंबई पोर्ट संघाच्या स्टीफन स्वामी ने दुसरा मैदानी गोल करत संघास अजिंक्यपद प्राप्त करून दिले.
तत्पूर्वी, आजच्या सकाळचा पहिल्या उपांत्य लढतीत महाराष्ट्र क्रिडा मंडळ कोल्हापूर संघाने सातारा डिस्ट्रिक्ट हॉकी असोसिएशन फलटण संघाचा ३-० गोलनी पराभव केला. सामन्याच्या पूर्वाधार्त १८ व्या व २५ व्या मिनिटास महाराष्ट्र कोल्हापूर च्या च्या समीर भोसले ने २ गोल केले. उत्तरार्धात ३२ व्या मिनिटास संकेत पाटील ने गोल करत महाराष्ट्र संघास अंतिम फेरी गाठून दिली. या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून महाराष्ट्र कोल्हापूर चा गोलकिपर विश्वजीत मेंगाणे याचा सत्कार करण्यात आला.
दुसऱ्या उपांत्य लढतीत मुंबई पोर्ट ऑथॉरिटी स्पोर्ट्स मुंबई संघाने यजमान निशिकांत दादा स्पोर्ट्स संघाचा शूटआऊट वर २-१ गोलनी पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
सामन्याच्या पूर्ण वेळेत दोन्ही संघाकडून गोलसाठी प्रयत्न केले गेले. मात्र दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही. सामन्याची पूर्ण वेळ संपल्याने व सामना ०-० गोल बरोबरीत राहिल्याने शुटाऊट चा वापर करण्यात आला. यामध्ये मुंबई पोर्ट संघाकडून रोमेश पिल्ले व अथर्व कांबळे यांनी दोन गोल करत संघासाठी फेरी गाठून दिली. निशिकांत दादा संघाकडून गणेश बिराजदार ला एकमेव गोल करता आला. या सामन्यासाठी उत्कृष्ट खेळाडू म्हणून मुंबई पोर्ट संघाचा गोलकीपर प्रवीण गोंदोले याचा सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेसाठी पहीले बक्षीस ५१ हजार रुपये व पारितोषिक तर दुसरे बक्षीस ३१ हजार रुपये व पारितोषिक असे होते.
बक्षीस वितरण समारंभासाठी निवडणूक प्रमुख शिराळा विधानसभा, भाजपा प्रदेश सदस्य सम्राट महाडिक, प्रांताधिकारीअर्जुन श्रीनिवासन, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेशचव्हाण, पोलीस निरीक्षक संजय हरूगडे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी नगरसेवक शिवाजी पवार, वैभव पवार, चेतन शिंदे, अशोक खोत, महेश पाटील, राजेंद्र पवार, भास्कर मोरे, राष्ट्रीय कबड्डीपटू मानसिंग पाटील, सयाजी जाधव, सयाजी पवार, जी एस पाटील, श्रीमती प्रबोधिनी पोरे, सनी खराडे, तेजस्विनी पाटील, उद्योजक संजय बिंदगे, अमोल राजमाने, विक्रम पाटील,अशोक जाधव, अशोक पाटील,मुस्ताक ढगे, अजित पाटील, अशोक जाधव आदी तसेच सर्व खेळाडू प्रेमी उपस्थित होते, स्वागत व प्रास्ताविक अजित पाटील यांनी केले. आभार अशोक जाधव यांनी मानले.

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू
बेस्ट गोलकीपर
ऋषिकेश कलकुटकी
निशिकांत दादा स्पोर्टस फाउंडेशन
बेस्ट डिफेन्स
आदेश पाटील
महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूर
उत्कृष्ट हाफ
प्रशांत पुजारी
निशिकांत दादा स्पोर्टस फाउंडेशन
बेस्ट फॉरवर्ड
संकेत पाटील
महाराष्ट्र क्रीडा मंडळ
मॅन ऑफ द मॅच
स्टीफन स्वामी
मुंबई पोर्ट मुंबई
स्पर्धेतील मालिकावीर
स्टीफन स्वामी
मुंबई पोर्ट मुंबई









































































