Last Updated on 03 Dec 2025 6:56 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राजभवनचे नाव बदलून ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी याबाबत राजभवन सचिवालयाला निर्देश जारी केले.
राज्यपालांनी सांगितले की, हा निर्णय राजभवन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि जनकल्याणाशी जोडलेले केंद्र बनवण्याच्या उद्देशाने घेतला असून, ‘लोकभवन’ हे नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागाचे आणि शासनाशी संवादाचे प्रभावी व्यासपीठ बनेल.
✔ ‘लोकभवन’ म्हणजे…
राज्यपालांच्या मते, ‘लोकभवन’ आता केवळ निवासस्थान किंवा औपचारिक कार्यालय न राहता
विद्यार्थी, संशोधक, शेतकरी
नागरी संघटना
समाजातील विविध घटक
यांच्यासोबत थेट संवाद आणि सहभागाचे केंद्र म्हणून कार्य करेल.
यांच्यासोबत थेट संवाद आणि सहभागाचे केंद्र म्हणून कार्य करेल.
✔ निर्णयामागची भूमिका
राज्य आणि सरकार यांच्यामध्ये सेवा, सहकार्य आणि संवादाचा पूल निर्माण करणे, हीच या नामांतरामागील भूमिका असल्याचे राज्यपालांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘‘लोकभवन संवैधानिक कर्तव्यांसोबतच समाजाच्या अपेक्षा, समस्यांप्रति संवेदनशील राहून, लोकांशी थेट नाते जोडणारे स्थान बनेल.’’
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Apr 2026 9:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit Manifestation : आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात प्रत्येकजण यशाच्या मागे धावत आहे. कष्टाला पर्याय नाही हे खरे असले,... Read more













































































