Last Updated on 09 Nov 2022 10:38 AM by Sanjay Patil/Adhorekhit
दिल्ली | मंगळवारी रात्री उशिरा भारत,चीन आणि नेपाळमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 पर्यंत मोजली गेली.
नेपाळमध्ये झालेल्या या भूकंपाचे तीव्र धक्के राजधानी दिल्लीसह उत्तर भारतालाही जाणवले. उत्तर प्रदेशातील लखनौ, मुरादाबाद, मेरठ, बरेली शहर भूकंपाने हादरले.अचानक हादरले बसल्याने अनेक लोक घराबाहेर पडले. अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना झाल्याचं समोर आलेलं नाही.नेपाळच्या सीमेवर उत्तराखंडमधील पिथौरागढ येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली. तब्बल दोन वेळा हे धक्के जाणवल्याने अनेक जण आपल्या घरातून बाहेर आले.
दरम्यान,मागील 24 तासांमधील नेपाळमधील हा दुसरा भूकंपाचा धक्का आहे. याआधी मंगळवारी सकाळी 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते.यापूर्वी 2015 मध्ये नेपाळमध्ये राजधानी काठमांडू आणि पोखरा शहरादरम्यान 7.8 रिश्टर स्केलचा उच्च-तीव्रतेचा भूकंप झाला होता.या भूकंपात 8 हजार 964 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 22 हजार जण जखमी झाले होते, असे म्हटले जाते.












































































