Last Updated on 07 Aug 2021 6:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शेतकऱ्याचा मुलगा ठरला सर्वांसाठी आदर्श
टोकियो : अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकण्यासाठी भारताची 121 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. भाला फेकणारा नीरज चोप्रा याने या खेळात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने अंतिम फेरीत 87.58 मीटर थ्रो करत सुवर्ण पटकावले. मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांचे ब्रॉन्झ मेडल सेकंदापेक्षाही कमी अंतरानं हुकलं होतं.
हा दुष्काळ नीरज यंदा संपवेल अशी देशाला आशा होती,आणि नीरजनेही देशाचं स्वप्न पूर्ण केलं. यापूर्वी एशियन गेम्समध्ये नीरजनं गोल्ड मेडल मिळवलं होतं.
अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकण्यासाठी भारताची 121 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. भाला फेकणारा नीरज चोप्रा याने या खेळात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने अंतिम फेरीत 87.58 मीटर थ्रो करत सुवर्ण पटकावले.
13 वर्षांनंतर भारताला सुवर्ण
ऑलिम्पिक स्पर्धेत 13 वर्षानंतर भारताला एखाद्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे. यापूर्वी 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक नेमबाज अभिनव बिंद्राला सुवर्णपदक मिळाले होते. बिंद्राने 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते.
भारताचे आतापर्यंतचे 10 वे सुवर्ण
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे हे आतापर्यंतचे 10 वे सुवर्णपदक आहे. भारताने यापूर्वी हॉकीमध्ये 8 आणि नेमबाजीमध्ये 1 सुवर्णपदक जिंकले आहे. अशा प्रकारे, हे भारताचे केवळ दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक आहे.
भारताचे सर्वात यशस्वी ऑलिम्पिक
हे भारताचे सर्वात यशस्वी ऑलिम्पिक ठरले आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने 6 पदके जिंकली होती. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली आहेत. नीरजच्या सुवर्ण व्यतिरिक्त मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य, पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक आणि बॉक्सिंगमध्ये लोव्हलिना बोर्गोहेनने कांस्यपदक जिंकले आहे.
नीरजने पूर्ण केले मिल्खा सिंह यांचे स्वप्न
नीरजने आपले मेडल मिल्खा सिंह यांना केले समर्पित, म्हणाला – ‘मी माझे सुवर्णपदक महान मिल्खा सिंह यांना समर्पित करतो. ते मला स्वर्गातून बघत असतील. मला पदकासह मिल्खा सिंह यांना भेटायचे होते. मी कधीच सुवर्णपदक जिंकण्याचा विचार केला नव्हता, पण काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. मला माहित होते की आज मी माझे सर्वोत्तम काम करेन. मला ऑलिम्पिकचा विक्रम मोडायचा होता, कदाचित म्हणूनच मी चांगली कामगिरी करु शकलो.
जाणून घ्या त्याचा जीवनप्रवास…
नीरज साधारण १० वर्षांचा असताना त्याचे वजन अधिक होते. नीरजचे वजन कमी करण्यासाठी त्याला पानिपतच्या शिवाजी स्टेडियमवर त्याचे वडील व काकांनी पाठवले. शिवाजी स्टेडियमवर नीरजला अनेक खेळ शिकविण्यात आले.त्याचे जास्त वजन असल्याने तो वेगाने धावू शकत नव्हता. उंच उडी तसेच लांब उडी मारणे त्याला अत्यंत कठीण जात असे. एक दिवस नीरज त्याच्या मित्रांसोबत फिरताना त्याने काही खेळाडूंना भाला फेकताना पाहिले. त्याने गंमत म्हणून भाला उचलला आणि तो फेकला.
.
त्याने फेकलेला भाला पाहून आजूबाजूचे सर्व खेळाडू स्तब्ध झाले होते. केवळ ११ वर्षांच्या नीरजने भाला 25 मीटरपेक्षा अधिक दूर फेकला होता. याच दिवशी नीरज चोप्रा भालाफेक खेळासाठी बनला आहे हे सर्वांना समजले.या काळात जेवलीन थ्रोच्या भाल्याची किंमत सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत होती. अखेर नीरजच्या हातात एक स्वस्त भाला आला परंतु त्याचा खेळातील आत्मविश्वास अमूल्य होता. नीरजने भाला फेकण्याचा सराव तासनतास करू लागला.

नीरज चोप्राकडे सुरुवातीच्या काळात प्रशिक्षकदेखील नव्हते परंतु त्याने हार मानली नाही. नीरज चोप्राने यूट्यूबवर व्हिडिओ पाहून भाला फेकण्याचे प्रशिक्षण घेऊ लागला.भालाफेकीचे दररोज वेगवेगळे व्हिडीओ बघून तो शेतात त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर नीरजने यमुनानगरमध्ये प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.ज्यामुळे तो आज करोडो लोकांसाठी आदर्श ठरला आहे.
2013 साली नीरजने जागतिक युवा चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता. युक्रेनमध्ये झालेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राची कामगिरी निराशाजनक ठरली. या स्पर्धेत तो 19 व्या स्थानावर राहिला. स्पर्धेत तो केवळ 66.75 मीटरपर्यंत फेकू शकला.वुहानमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये नीरजने 70.50 मीटर अंतरावरून भालाफेक करून नववे स्थान प्रप्र्ता केले. 2016 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजने 82.23 मीटर अंतरासह भालाफेक करीत सुवर्णपदक कमवले.
त्याच वर्षी नीरज चोप्राने वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये 86.48 मीटरवर भालाफेकमध्ये जागतिक विक्रम केला. नीरज चोप्राने सुवर्ण जिंकल्याने तो प्रकाशझोतात आला. 2017 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नीरज चोप्राने 86.47 मीटरच्या भालाफेकाने देशासाठी सुवर्णपदक पटकाविण्याची कामगिरी केली.
2018 मध्ये त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत 88.06 मीटर थ्रोसह पुन्हा एकदा सुवर्ण जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये पोहोचण्यासाठी नीरजला अनेक धोकादायक दुखापातींसह करोनाचादेखील सामना करावा लागला.परंतु हार न मानता त्याने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून आज देशाचा सन्मान वाढविला आहे. त्याच्यावर संपूर्ण देशातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.















































































