Last Updated on 16 Sep 2025 6:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे | भारत निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), पुणे व नागपूर विभागातील पदवीधर तसेच अमरावती व पुणे विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघांसाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.
पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत :
जाहीर सूचना प्रसिद्धी – मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५
वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुनःप्रसिद्धी – बुधवार, १५ ऑक्टोबर २०२५
वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुनःप्रसिद्धी – शनिवार, २५ ऑक्टोबर २०२५
प्रकरणपरत्वे नमुना १८ किंवा १९ द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५
हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई – गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५
प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी – मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२५
दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी – मंगळवार, २५ नोव्हेंबर ते बुधवार, १० डिसेंबर २०२५
दावे व हरकती निकाली काढणे, पुरवणी यादी तयार करणे व छपाई – गुरुवार, २५ डिसेंबर २०२५
अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी – मंगळवार, ३० डिसेंबर २०२५
या पुनरिक्षण कार्यक्रमानुसार संबंधित मतदारांनी वेळेत आवश्यक दावे सादर करुन नाव नोंदणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.








































































