Last Updated on 28 Oct 2021 1:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
संस्थांच्या वाढीसाठी सर्व घटकांचा सकारात्मक प्रतिसाद आवश्यक असतो. आपल्या पतसंस्थेने पत असलेल्या सभासदांची पत आणखी वाढविण्यासाठी यशश्वी प्रयत्न केले आहेत. ठरावीक टप्पा ओलांडल्यावर पतसंस्थेने बदलत्या नवनवीन धोरणांचा अवलंब करावा आणि बदल करण्याची भुमिका स्विकारावी असे आवाहन वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव ॲड.बी. एस. पाटील (आण्णा) यांनी केले.
इस्लामपूर येथील एस. डी. पाटील सहकारी पतसंस्थेच्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. संस्थापक ॲड. बी. एस. पाटील (आण्णा) यांच्या उपस्थितीत व संस्थेचे चेअरमन प्रकाश बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेची सभा ऑनलाइन संपन्न झाली.या ऑनलाइन सभेला सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सभासदांना १० टक्के लाभांष देण्याचा निर्णय सभेत झाला.
ॲड. बी. एस. पाटील (आण्णा) म्हणाले, ‘कोरोना सारख्या महामारीतही आर्थिक अडचणीवर मात करून या पतसंस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने आहे. संस्थांनी सभासदांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर सुधारावा. एस. डी. पाटील सहकारी पतसंस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाने घालून दिलेला पायंडा असाच पुढे सुरू रहावा. आर्थिक संकटाच्या काळातही संचालक मंडळाने सभासदांना १० टक्के लाभांष देण्याचा निर्णय घेतला आहे. पतसंस्थेचे वाढते भागभांडव ही संस्थेच्या प्रगतीची पावती आहे. तरीही पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहाराच्या वाढीसाठी शासनाच्या बदलत्या धोरणा नुसार सभासद वाढीसाठी प्रयत्न करावेत.’
पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश बनसोडे म्हणाले, पतसंस्थेने संपलेल्या आर्थिक वर्षासाठी सभासदांना १० टक्के लाभांष देण्याचा निर्णय घेतला आहे. सभासदांच्या आणि संस्थेच्या हितासाठी जीवन रक्षक ठेव दुप्पट करण्यात आली आहे. जीवन रक्षक ठेव वाढविल्यामूळे मृत सभासदांच्या वारसांच्यावर कर्जाचा बोजा राहणार नाही तसेच जामिनदार सभासदही सुरक्षीत राहणार आहे.
पतसंस्थेचे मार्गदर्शन व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य ॲड. धैर्यशील पाटील यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले. संचालक प्राचार्य डॉ. ए. एम. जाधव यांनी स्वागत केले. व्हा. चेअरमन उत्तम शिनगारे यांनी अहवाल वाचन केले.प्रा. मकरंद बडवे यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन केले.सुजय यादव यांनी अंदाज पत्रकाचे वाचन केले. प्रा. डॉ. मेघा संजय पाटील यांनी ताळेबंद पत्रकाचे वाचन केले. सौ. सुनीता पाटील यांनी नफा-तोटा पत्रकाचे वाचन केले.यशवंत जाधव यांनी लेखा परीक्षक नियुक्तीचा ठराव मांडला.प्रा. संदीप सानप यांनी सूत्रसंचालन केले.सचिव सुभाष नांगरे, सतीश दळवी,सुरेश शिंदे,सचिन कांबळे यांनी संयोजन केले.शाहू पाटील यांनी आभार मानले.










































































