Last Updated on 07 Jan 2022 12:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जगभरात नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. नवीन वर्ष जगभरात 1 जानेवारीला सुरु होते असे मानणारा वर्ग मोठा आहे. ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार कालगणने प्रमाणे 1 जानेवारी पासून नवीन वर्ष सुरु होते. ज्या देशांमध्ये इंग्रजांनी राज्यकेली त्या देशांमध्ये आजही याच कॅलेंडर्सचा वापर केला जातो. मात्र असे असले तर प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी असून त्यानुसार कॅलेंडर आणि कालगणना केली जाते. जसे की मराठी नव वर्षाची सुरवात गुढीपाडवा चैत्र या मराठी महिन्यापासून होते. भारताचा विचार केला तर आपल्याकडे अशी 36 पंचांगे किंवा कॅलेंडर होती त्यातील 12 आजही वापरात आहेत. मात्र असे असले तरी 1 जानेवारी पासून सुरु होणाऱ्या इंग्रजी वर्षाचे भारतात देखील उत्साहात स्वागत केले जाते. मात्र तुम्हाला माहिती आहे का भारतात इंग्रजी नवीन वर्ष सुरु होण्या आधी या देशांमध्ये नववर्षाला प्रारंभ झालेला असतो.
इथे नववर्षाचे पहिले पाऊल
नववर्षाचे पहिले पाउल प्रशांत महासागरातील किरीबाटी द्वीपावर सामोआ राज्यात सुरु होणार आहे. ज्यावेळी भारतीय वेळेनुसार आपल्याकडे दुपारचे 3.30 मिनिटे झाली असतील, तेंव्हा त्या ठिकाणी रात्रीचे 12 वाजलेले असतील. त्या पाठोपाठ न्यूझीलंड येथे भारतीय वेळेनुसार 3.45 मिनिटांनी नववर्ष सुरु होईल. या यादीत चीन, जपान, सिंगापूर सहित 14 देश आहेत आणि नवीन वर्ष सुरु होण्यात भारताचा नंबर 15 वा असेल.
सगळ्यात शेवटी इथे नववर्ष
नवीन वर्ष सर्वात शेवटी प्रशांत महासागरच्या भू मध्य रेषेवर उत्तरेकडे असलेल्या हाऊलंड बेटावर व हवाई आणि ऑस्ट्रेलियामधील बेकेट आयलंडवर सुरु होईल. त्यावेळी भारतात तारीख असेल 1 जानेवारी आणि वेळ 5.30 मिनिटे असेल. तर भारताच्य़ा शेजारील राष्ट्रात भारतीय वेळेच्या अर्ध्या तासाने पाकिस्तानात नववर्षाचे पाउल पडेल.













































































