Last Updated on 29 Jun 2020 3:34 AM by
हे कुठलंही ५ स्टार हॉटेल किंवा रिसॉर्ट नाही
हे एका शेगाव नावाच्या एवढ्याश्या गावातील ‘भक्त निवास’ आहे.संत गजानन महाराज मंदिर संस्थांना अंतर्गत निर्मित आणि चालित अनेक उपक्रमांपैकी स्वच्छता आणि सुविधेचा सर्वोच्च गाठलेला हा एक उपक्रम. शेगावला सर्वदूर ठिकाणांहून भाविक भेट देत असतात. त्यांच्या राहण्यासाठी केलेली ही सोय. रूमचा किराया ० रुपयापासून ते ९०० रुपयापर्यंत.

पण ९०० रुपयांची आणि ० रुपयांची खोली सारखीच स्वच्छ आणि टापटीप.धुळीचा कण नाही की कागदाचं कस्पट नाही! भाविकांच्या लहान सहान गरजा लक्ष्यात घेऊन डोकं गुंग होऊन जावं इतकं बरकाईने लक्ष्य दिलेलं. पार्किंगमध्ये ठेवलेल्या व्हीलचेअरपासून प्रसाद म्हणून द्रोणात काही दिल्यास आठवणीनं मिठाची पुडी देण्यापर्यंत.शिवाय दर पन्नास पावलांवर भारतीय/पाश्चात्य प्रसाधन. आपल्या घरच्यापेक्षा कैकपटीने स्वच्छ! गजानन महाराज मंदिर संस्थानचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इतके शंभरातले फक्त चार दोन लोकच पगारी आहेत. बाकी सर्वजण सेवादान करतात.
तुम्ही कुठे बसल्या बसल्या नकळत हातातला कागद खाली टाकलात तर एक सेवेकरी येतो आणि हासमुखाने सफाई करून जातो. इथली स्वच्छता एक भारतीय म्हणून आपल्या मुस्कडात मारून जाते! संस्थानांतर्गत कुठेही तुम्हाला अस्वच्छता दिसणार नाही.अगदी ६०० एक्कर पसरलेल्या ‘आनंद सागर’उद्यानात देखील कोपरा न् कोपरा चकाचक दिसतो.

क्षणभर आपण भारतात आहोत की नाही कळणार नाही. कुठे जळमटं नाहीत, सुपारी खाऊन थुंकलेले डाग नाहीत, प्रसाधनांच्या बाहेर दुर्गंध नाही, धूळ नाही, रंगाचे पोपडे उडालेले नाहीत काहीच नाही. शिवाय इथे खाण्यापिण्याचे दर पाहून संसदेच्या ‘त्या’ वायरल पोस्टची हमखास आठवण ये.अवघ्या ७ रुपयांना इथे प्लेटभर पोहे आणि १४ रुपयांना पायनापाल शेक मिळतो.
एकदा येऊन अनुभवा हा सोहळा.








































































