Last Updated on 10 Apr 2026 7:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना कमवा व शिका धर्तीवर शिक्षण घेऊन रेठरे हरणाक्ष येथील जयकर शिवाजीराव शिंदे यांनी पॅथॉलॉजीच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. गेली २६ वर्षे झाले जयकर शिंदे व त्यांच्या पत्नी सौ.स्वाती शिंदे हे ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांच्यासाठी ईश्वरपूर येथील शिंदेज लॅबोरेटरी अँड मायक्रोबायोलाजी सेंटरच्या माध्यमातून सेवा देत आहेत.
कमवा व शिका धर्तीवर पॅथॉलॉजी क्षेत्रात उमटवला ठसा
रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा जि. सांगली)या खेडेगावात जयकर शिंदे यांचा जन्म १४ डिसेंबर १९७५ साली शेतकरी कुटुंबात झाला.अत्यंत हलाखीची घरची परिस्थिती, वडिलांनी शेतमजूरी करून घरखर्च करत तिन्ही मुलांची शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक माध्यमिक शिक्षण गावीच झाले. कमवा व शिका धर्तीवर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

गेली २६ वर्षे झाले ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांच्यासाठी शिंदेज लॅबोरेटरी अँड मायक्रोबायोलाजी सेंटरच्या माध्यमातून ते आज सेवा देत आहे. सौ.स्वाती शिंदे यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९८३ रोजी शिक्षक कुटुंबात झाला. B.Sc. PGDMLT पर्यंत लग्नाअगोदर शिक्षण पूर्ण केले. लग्नानंतर मुलगी लहान असूनही पोस्ट ग्रॅज्युएटच्या ध्येयाने भारती मेडिकल कॉलेजमध्ये M.Sc. Medical Microbiology ही पदव्युत्तर डिग्री प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. पाच वर्षे सहाय्यक प्रोफेसर म्हणून प्रकाश मेडिकल कॉलेजमध्ये काम पहिले. सध्या स्वतःचे अत्याधुनिक मायक्रोबायोलाजी सेंटर इस्लामपूरमध्ये सुरु आहे.
जयकर शिंदे हे १९९६ साली DMLT ही एक छोटीसी पदविका घेऊन इस्लामपूरला आले. प्रत्येकाच्या आयुष्यात दर-दर की ठोकरे असतात तशी त्यांच्याही आयुष्यात आली.रेठरे हरणाक्ष ते इस्लामपूर हा प्रवास फक्त आठ रुपयांचा होता, तोही त्यांच्यासाठी खूप महाग होता. सुरुवातीला ईश्वरपूर व नेर्ले येथे छोटीसी लेबोरेटरी सुरु केली. सकाळी नेर्ले व दुपारी ईश्वरपूर पण रुग्णांची फक्त वाट पाहण्याशिवाय काहीही पर्याय नव्ह्ता, कारण त्यावेळी रक्त तपासणी फार कमी केली जायची. सहा एक महिन्यानंतर काम सुरु केले, जम बसत नव्हता, येणेजाणे सुद्धा मुश्किलीने निघायचे. दरम्यान रिकामा वेळ घालवण्यासाठी डॉ वैभव राजे, डॉ.जितेंद्र लादे व डॉ विकास जाधव यांच्याकडे बसायचे. याही तिघांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.

मध्यंतरीच्या काळात ईश्वरपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये काम करण्याची संधी मिळाली.त्या संधीचे सोने करता आले. त्याचवेळेस लक्षात आले की रुग्णांच्या आरोग्याची किंमत, वेळ व उपचार तसेच आपले स्वताचे शिक्षण, ज्ञान सुद्धा वरचेवर अपग्रेड केले पाहिजे याची प्रखर जाणीव त्यांच्या आयुष्यात मनात निर्माण झाली त्यामुळेच की काय आज त्यांच्याकडे M.Sc(Micro) B.Sc.M.L.T. या पेरामेडीकल क्षेत्रातील पदव्या प्राप्त झाल्या.
आयुष्यात खूप काही शिकायला मिळाले, ताट मानेने उभा केले, अचूक रिपोर्टला किती महत्व असते, रुग्णासाठी अचूक रिपोर्ट किती महत्वाचे असतात हे कळाले. एकेकाळी त्यांच्या पेरावैद्यकीय सेवेला कलाटणी मिळाली. त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची ओळख जिल्ह्यात झाली.अनुभवातूनच मिळालेल्या या प्रेरणेच्या आधारावरर्तीच शिन्देज लेबोरेटरी व मायक्रोबायोलॉजी सेंटर उभा करू शकले. वाळवा तालुक्यात जिल्ह्यात एक विश्वासू लेबोरेटरी व मायक्रोबायोलॉजी सेंटर म्हणून नावारूपाला आले असे म्हणावेसे वाटते.
शिन्देज लॅबोरेटरी म्हणजेच आरोग्य तपासणीचे माहेरघर
पुढील दशकाची झेप घेत असताना आज निनांत गरज आहे ती अद्यावत सुसज्ज व संपूर्णपणे निर्जंतुकीकरण यंत्रणा असणारी लॅबोरेटरी. नुकत्याच जगावर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटातून आपल्याला शहाणपण येणे अत्यंत निकडीचे बनले आहे. तसे बघितलं तर कोणतीही तपासणी करण्याची आवश्यकता भासते तेव्हा सर्व प्रथम लॅबोरेटरी दिसते म्हणजेच शिन्देज लॅबोरेटरी असेही म्हणायला हरकत नाही. लॅबोरेटरी म्हणजेच आरोग्याच्या निदानाचं जणू माहेरघर म्हंटले पाहिजे. संपूर्ण जगावर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आपल्याला बरेच काही शिकावयास मिळाले आहे. परंतु जर या कोरोनाच्या काळातील त्रुटींचा आपण अभ्यास करून जर पुढील येणाऱ्या दशकातील आरोग्याच्या समस्या विरोधात लढण्यासाठी तयार झालो तरच आपण या संकटातून खरंच काही शिकलो असे जयकर शिंदे म्हणतात.

गेली अनेक वर्षे लॅबोरेटरी चालवत असताना वेळोवेळी ते बदल करत गेले. पण तरीसुद्धा जणू आभाळ कोसळल्यासारखं झाले होते कारण जस कोरोनाचं संकट वाढत होत तसं मनुष्यबळ आपलं स्वतःच मनोबल हरवत चाललेलं दिसत होत. फक्त कारण होत ते आयशोलेशन किंवा आयसोलेटेट अश्या संपूर्ण गोष्टी नव्हत्या कारण आजपर्यंत आपण बॅक्टेरिया संसर्गाच्या विरोधात सर्व सुविधा उपलब्ध करीत आलो पण जेव्हा विषाणू पसरत गेला तेव्हा मात्र वैद्यकीय सुविधांतील सेवेतील अभाव समोर येत रहिला व तो भयंकर वाढत वाढत वाढत गेला. आता मात्र या लॅबोरेटरीत विशेष नियोजन, संपूर्ण अद्यावत यंत्रणा, सुसज्ज व प्रशिक्षित तज्ञ लॅबोरेटरीमध्ये काम करणारी व्यक्ती ही सर्व उच्चशिक्षीत व त्या त्या विषयातील तज्ञ असणे अत्यंत गरजेचे आहे. संपूर्ण लॅबोरेटरी स्टाफ हा प्रशिक्षित असला पाहिजे व त्याला येणाऱ्या दशकातील आरोग्याच्या संकटांचा अभ्यास असला पाहिजे. लॅबोरेटरी मधील यंत्रणा ही अद्यावत पूर्णतः अटोमेटेड,सेमी अटोमेटेड असली पाहिजे ह्या यंत्र सामग्रीचा दरवर्षी मानांकन अथवा कॅलिब्रेशन करणाऱ्या संस्थाकडून कॅलिब्रेशन केले गेले पाहिजे. लॅबोरेटरी हि पूर्णतः स्वच्छ व प्रकाशमान असावी. लॅबोरेटरीसाठी वेगवेगळे विभाग जसे वेटिंग रूम, ब्लड कलेक्शन चेंबर, कोविड सॅम्पल कलेक्शन चेंबर,प्रोसेसिंग लॅबोरेटरी असे असावेत. व हे सर्व विभाग दिवसातून कमीतकमी तीन वेळा तरी सॅनिटाईज केले गेले पाहिजेत. लॅबोरेटरीचे स्वच्छतागृह ही नेहमी स्वच्छ असणे आवश्यक बाब आहे असे जयकर व सौ. स्वाती शिंदे म्हणतात.
आजच्या लॅबोरेटरी विभागास जसे महत्त्व आहे तसेच ते येणाऱ्या दशकात अतिशय महत्त्वाचे व निदानाचे बनणार यात शंका नाही. लॅबोरेटरीमध्ये येणाऱ्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन, तपासणी विषयी माहिती ,सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर याविषयी त्या-त्या वेळी मार्गदर्शन केले गेले पाहिजे. लॅबोरेटरीच्या समोरच्या भागात याविषयीचे मार्गदर्शन फलक असावेत. वेटिंग रूम मध्ये हॅन्ड सॅनिटायझर व वरचेवर एअर सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. जेणेकरून कोरोनासारख्या विषाणूपासून आपला बचाव होऊ शकतो व येणाऱ्या दशकातील आरोग्याच्या समस्याविरोधात आपण मोठ्या आत्मविश्वासाने समोर जाऊ असा पूर्ण आत्मविश्वास असल्याचे ते सांगतात.
साधारण मागच्या नोव्हेंबर २०१९ मध्ये कोरोना या महामारीची चर्चा जगभर होऊ लागली सुरुवातीला अतिशय दुर्लक्षपणे याकडे बघतल्यामुळे याची तीव्रता लक्षात आली नाही. १९९९ पासून शिंदे पति-पत्नी ईश्वरपूरमध्ये लॅबोरेटरी चालवत आहेत.परंतु मार्च मध्ये कोरोनाने पाय पसरले आणि सर्वांच्या काळजाचा जणू ठोका चुकला.स्वाईन फ्लू सारख्या आजारात त्यांनी काम केले असलेने अनुभव पाठीशी होता.परंतु त्यांच्या घरी लहान बाळ जन्मले आणि त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता त्याच्यासाठी त्यांनी त्यांचे सेंटर एक महिना पूर्ण बंद ठेवले. परंतु नियतीला जणू हे मान्य नव्हते आणि २१ एप्रिलला त्यांच्यावर आभाळ कोसळले त्यांच्या लहान बाळाला उलटी झाली व ती फुफुसात गेली व त्यात तो त्यांना अर्ध्यावरतीच सोडून गेला. कोरोना महाभयंकर साथीमुळे ते त्यांचे दुःख उराशी ठेवून राहिले. लॉकडाऊनचा काळ त्यांच्यासाठी भयंकर होता आणि आता खरी परीक्षा होती.ईश्वरपुरातील मोठमोठे हॉस्पिटल,डॉक्टर, सेवा स्थगित ठेवत होते. कोरोनाची चाचणी करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. सिनियर लोकांचे म्हणणे होते आपल्यापेक्षा, आपल्या कुटुंबापेक्षा पैसे मोठा नाही. काही करावे कळात नव्हते. ते, आई वडील पत्नी मुलगी अपार दुःखात बुडालेली असताना निर्णय घेणे भाग पडले. कुटुंबियांना समजावले देव जर माझ बाळ चांगलं असताना घरातून नेत असेल तर मला कोरोना रुग्णांची चाचणी करताना काही झालं तर हरकत नाही त्यांनी काम करणेच निर्णय घेतला. सुदैवाने त्यांना व त्यांच्या कुटुंबातील कोणालाही कोरोनाची लागण झाली नाही. कदाचित असंही असू शकेल लहान बाळाचा तो लाभलेला मोठा आधार होता.
प्रत्येक रुग्ण तपासणीसाठी येत होता तेव्हा तो अर्ध्यापेक्षा जास्त भीतीने जणू मरण पावलेला दिसत होता. प्रत्येकाशी व्यवस्थित बोलून त्याला आधार देवून त्यांनीअश्या भयानक काळात जवळजवळ २ हजारच्या वरती बाधित रुग्णाची तपासणी करून दिली याचा आज त्यांना खूप अभिमान वाटतो व ईश्वरपूर व वाळवा तालुक्यातील रुग्णांची सेवा करण्याची संधी गवसली याचा खूप आनंद आहे. या अश्या अनेक सुख दुःखात सौभाग्यवती स्वाती माझ्या साठी हिमालयासारखी नेहमीच उभी राहिली याचा मला सार्थ अभिमान वाटतो व एवढंच म्हणेन आज जे काही शिंदेज लॅबोरेटरी अँड मायक्रोबायोलॉजी सेंटरचे विश्व निर्माण झाले आहे ते माझ्या पत्नीमुळेच आज आम्ही आमची लॅबोरेटरी सुसज्ज अद्यावत यंत्रसामुग्रीने परिपूर्ण करून लोकांना कमीतकमी वेळेत रिपोर्ट देत असल्याचा आनंद वाटतो. आमच्या हातून रुग्नांची सेवा अशीच घडत राहो एवढीच विधात्याकडे मागणी जयकर शिंदे करतात.












































































