Last Updated on 10 Apr 2026 7:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
पंचकर्म आणि केरळीयन उपचार पद्धतीद्वारे असाध्य आजारांवर मात
![]()
ईश्वरपूर :
बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी आरोग्य धोक्यात आले असताना, निसर्गदत्त आयुर्वेद आणि पंचकर्म उपचारांची गरज अधोरेखित होत आहे. ईश्वरपूर येथील ‘प्रकृती आयुर्वेद चिकित्सालय, केरळीयन पंचकर्म, ॲक्युपंक्चर व पॅरालेसीस सेंटर’च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णांना व्याधीमुक्त करण्याचे कार्य अविरत सुरू आहे. तज्ज्ञ वैद्यकीय मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या केंद्राने आधुनिक वैद्यकशास्त्राला आयुर्वेदाची जोड देत आरोग्य क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या चिकित्सालयात वैद्य रणजीत पाटील (M.D. आयुर्वेद) आणि सुवर्णपदक विजेत्या वैद्य सौ. विजया पाटील यांच्या थेट देखरेखीखाली रुग्णांवर उपचार केले जातात. केवळ तात्पुरते आजार बरे न करता, शरीरातील दोषांचे मूळ शोधून ते पंचकर्माच्या माध्यमातून बाहेर काढण्यावर येथे भर दिला जातो. यामध्ये वमन, विरेचन, नस्य, बस्ती आणि रक्तमोक्षण यांसारख्या शास्त्रीय प्रक्रियांचा वापर करून शरीरशुद्धी केली जाते. यामुळे जुनाट खोकला, मधुमेह, त्वचा रोग, पित्तविकार आणि वातविकारांवर अत्यंत प्रभावी परिणाम दिसून येत असल्याचे रुग्ण अनुभवातून सांगत आहेत.
विशेषतः अर्धांगवायू (पॅरालेसीस) आणि मणक्यांच्या तक्रारींवर येथे विशेष उपचार पद्धती उपलब्ध आहे. कंबरदुखी, गुडघेदुखी, मानदुखी यांसारख्या हाडांच्या व्याधींसाठी कटीबस्ती, जानूबस्ती व मन्याबस्ती यांसारखे केरळीयन उपचार दिले जातात. याशिवाय, आजच्या काळात वाढत्या वंध्यत्वाच्या समस्येवर स्त्री-पुरुष दोघांसाठीही येथे विशेष चिकित्सा उपलब्ध असून, महिलांच्या गर्भासंस्कार व आरोग्य तक्रारींसाठी ‘उत्तरबस्ती’ सारख्या प्रगत सुविधा पुरवल्या जातात. लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील येथे स्वतंत्र विभाग कार्यरत आहे.
निरोगी आयुष्यासाठी औषधांइतकेच पथ्यापथ्याला महत्त्व असून, बेकरी उत्पादने, शिळे अन्न आणि थंड पेये टाळून नैसर्गिक आहार घेण्याचे आवाहन चिकित्सालयामार्फत करण्यात आले आहे. ईश्वरपूर येथील बस स्टँड समोरील मोरे कॉलनी रोडवर हे केंद्र रुग्णसेवेसाठी सज्ज असून, शनिवारी साप्ताहिक सुट्टी वगळता इतर दिवशी या सुविधांचा लाभ घेता येईल.
![]()












































































