Last Updated on 02 Apr 2026 10:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर |
येथील पद्मावतीनगर भागात डॉ. जयकर शिंदे यांच्या निवासस्थानी सालाबादप्रमाणे चैत्री पौर्णिमेचे औचित्य साधून ‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबा देवाचा प्रकट दिन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक उत्सवानिमित्त विशेष पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी ईश्वरपूर शहरासह रेठरे हरणाक्ष परिसरातून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.

या मंगलमयी प्रसंगी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते आणि त्यांच्या सौभाग्यवती अर्चनाताई मोहिते यांनी उपस्थित राहून श्री जोतिबा देवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ईश्वरपूर नगरपालिकेचे जावेद मोमीन, शिवाजी जाधव, डॉ. संग्राम पाटील, माजी नगराध्यक्ष सौ अरुणादेवी पाटील, सौ मनीषा कुरळूपकर, सौ कांचन कोळेकर, संदीप माने हे विद्यमान नगरसेवक व पदाधिकारी तसेच उद्योगपती सुरेंद्रदादा पाटील व भारतीय जनता पार्टीचे विक्रमभाऊ पाटील, उमेश कुरूळपकर, विजय महाडिक, दीपक कोठावळे, प्रा. सुभाष खोत हे या कार्यक्रमास उपस्थित होते. डॉ. जयकर शिंदे यांच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरात चैत्री पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. महाप्रसादाच्या नियोजनासाठी डॉ. शिंदे परिवाराने विशेष परिश्रम घेतले असून, आलेल्या सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.








































































