Last Updated on 05 Apr 2026 1:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
संताजी सावकार : नावात ‘संत’, कार्यातही संतपणा
संताजी थोरात (सावकार) नाव घेतले तरी त्यांचे बाबतीत बोलण्यासारखं बरंच काही आहे. पण ओढ नावाची जी तहान असते ती कधी तृप्त होत नसते असा हा सुप्त माणूस आहे की जो ठळकपणे फिरताना जाणवतो. पण काम मात्र गुप्त पणे करतो म्हणून अशी माणसं नजरेसमोरून क्षणभरही लुप्त होत नाहीत एवढी ती व्याप्त असतात. भौतिक अर्थाने युक्त असणारी भरपूर असतात पण लौकिक अर्थाने उपयुक्त असणारी माणसे दुर्मिळ असतात. त्यापैकी हा माणूस एक माणूस अपवाद आहे यात कसला वाद नाही.
सहवास विरळ असला तरी त्यांच्या अस्तित्वाची दरवळ मात्र कायम अबाधित ठेवून क्षणात हिरवळ फुलवून दुसऱ्या क्षणी शिरवळ गाठणारा हा द्रूतगतीचा निर्मळ माणूस आहे. म्हणून ओळखला जातो. सदैव मदत ही या माणसाची आदत आहे.
माणसं ओळखण्याची व जोडण्याची अफाट कला संताजी सावकार यांच्यात देवाने दिलेली आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात पण प्रत्येकाला ते दिसत नाहीत. त्यासाठी विलासकाकां. उंडाळकर यांच्या सारखा प्रखर रत्नपारखी लागतो. मगच तो हिरा ओळखला जातो व कोंदलाही जातो. किशोरवयातच संताजीराव थोरात यांची अभिजातता काकांनी ओळखली व रयत संघटनेच्या कामात गुंतवून टाकले.
संताजी सावकार यांचा पिंड हा व्यवसाय व समाजकारणाचा आहे. त्यामुळं भलेही त्यांना राजकारणाचं अपेक्षित वेड किंवा ध्येय फारसे नाही पण राजकारण चांगलं घडावं, चांगल्यासाठी घडावं यासाठी त्यांची तळमळ , धडपड मात्र सदैव असते. हे महत्वाचं आहे कारण स्वतःचा स्वार्थ न ठेवता वैचारिक परमार्थ करणे ही गोष्ट हल्ली कुठेच दिसत नाही. पद, पैसा , खोटी प्रतिष्ठा यांसाठी जग वेडे झाले असताना, जन्मजात सावकार असूनही असला लोभ या माणसाला तसूभरही नाही. उलट कयास बांधून योग्य माणसं शोधणं व त्यांची नेत्यांना शिफारस करून त्यांच्या मागे ठामपणे उभं राहण्याचा सायास प्रयास करणे ही संतांजीराव या माणसाची वृत्ती व ख्याती आहे. त्यामुळे संताजी या नांवातच ‘संत’ हा शब्द हा योगायोग जरी वाटत असला तरी तो सार्थ ठरून गेलेला आहे. त्यामुळेच मन धन आणि जन या तीन्ही गोष्टी त्यांच्याकडे अफाट आहेत. ज्यांच्या पाठीला आणि खांद्याला विलासकाकांच्या हातांचा परीसस्पर्श झाला त्या माणसाला कसल्याही काळावर मात करण्याचे उदंड बाळकडू लाभले. कर्तबगारीच्या रूपाने त्याची सुवर्णमुद्रा सदैव तळपत राहते , झळकत राहते. तो माणूस आपला असेल तर वेगळाच आनंद असतो.
फटकळ नेत्याबद्दल काही अटकळ बांधणे ही अवघड गोष्ट असते. पण हा माणूस त्यातही पुष्कळ ठरला. विलासराव काकां उंडाळकरांच्या नजरेची भाषा व उदयसिंह पाटील उंडाळकर यांची स्वामी निष्ठा ओळखण्यात ते कधीच निष्फळ कमी पडले नाहीत. व त्यामुळे त्यांच्याही नजरेत ते कधीच वायफळ ठरले नाहीत. वस्तादाचा डावच नव्हे तर व्यथाही वाचता आली पाहिजे तेव्हाच गुरू शिष्य हे नातं फुलतं डुलतं. व्यवसायांचा व्याप सांभाळताना नात्यांचा बाप होवून जगणे ही तारेवरील कसरत असते. तिथेही ते कमी नाही ही हमी त्यांनी सिद्ध केली आहे. उर्मी भरपूर पण कसली गुर्मी नाही. नम्रता , आपुलकी , बांधिलकी यांचा निर्झर पाझर आहे. कधीच कसली कुजबुज नाही की कुरबुर नाही. काय असेल ते तोंडावर. असते. संताजी सावकारांचा आवार आणि अनेकविध क्षेत्रात मोठा मित्रपरिवार असल्याने याचा शिवार सदैव बहरलेला असतो. ज्याला झळा बसल्या तरी कळा येत नाहीत त्याचा लळा प्रयत्न करूनही तोडता येत नाही. तो विठ्ठलाचा मळा असतो जिथे प्रत्येक वारकरीही आगळा असतो. अशा गोपाळांचा मेळा सदैव सोबत असणाऱ्या पैकी संताजीराव थोरात एकमेव होत.
संताजी थोरात यांचा दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व हा एक गुण आज कराड तालुक्यातील तमाम रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांना आवडतो. कार्वे जिल्हा परिषद मतदार संघात त्यांनी पहिल्यांदा निवडणूक जिल्हा परिषद. निवडणूक लढवल्यानंतर अल्प मतांनी त्यांचा पराभव झाला पण या पराभवानंतरही या पट्ट्याने आपली जिद्द सोडली नाही त्यांनी गोळा केलेला कार्यकर्त्यांचा मेळा त्यांनी आजपर्यंत तुटू दिला नाही. त्याचेच फळ नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ विजयताई माने यांच्या विजयासाठी उपयोगी ठरला अत्यंत अडचणीच्या काळात त्यांनी कृष्णा काठाला ठराविक लोकांची मक्तेदारी मोडता येत नाही असे चित्र असतानाही ती मक्तेदारी मोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या सौभाग्यवती सौ विजयताई थोरात यांच्या विजयाचा झेंडा फडकावला असे संताजीराव सावकर समाजकारणातील एक भारदस्त व्यक्तिमत्व आहे त्यांच्या वाढदिवसाला खूप शुभेच्छा.
वैभव पाटील/उंडाळे










































































