Last Updated on 02 Apr 2026 8:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
‘बोला अंजनीपुत्र हनुमान की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
सांगली ।
बहे (ता. वाळवा) येथील श्री क्षेत्र रामलिंग बेटावर ‘बोला अंजनीपुत्र हनुमान की जय’ च्या जयघोषात, टाळ मृदुंगाच्या निनादात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत श्री हनुमान जयंती साजरी करण्यात आली.
पहाटे महाभिषेक-पुजा झाल्यानंतर ह.भ.प. लखन कोकीळ महाराज यांचे हनुमान जन्मकाळाचे श्रुश्राव्य कीर्तन झाले. त्यांना गावातील भजनी मंडळींनी भजन साथ केली. सूर्योदय होताच मंदिरासमोरील मंडपात मध्यभागी बांधलेल्या पाळण्यावरती बोला अंजनीपुत्र हनुमान की जयघोषात उपस्थित भाविकांनी पुष्पवृष्टी केली व जन्मकाळ संपन्न झाला. आरतीनंतर महिलांनी पाळणा म्हटला. सुंठवडा वाटण्यात आला.
उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी तीर्थक्षेत्र रामलिंग बेट देवस्थान समिती, ह.भ.प. लखन कोकीळ महाराज, रवींद्र बडवे, श्रीराम बडवे, प्रा. मकरंद बडवे, अधिक बडवे, लक्ष्मण बडवे, समीर बडवे,अनुज बडवे यांचे मोलाचे योगदान लाभले.










































































