Last Updated on 01 Feb 2025 12:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
Union Budget 2025 : अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी मोदी सरकार 03 चा अर्थसंकल्प शनिवारी सादर केला. या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि नोकरदारांच्या अनेक अपेक्षा होत्या. या अर्थसंकल्पातून आयकरात किती सुट मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु आजच्या अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी काही दिले नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, नवीन कर विधेयक पुढील आठवड्यात सभागृहात मांडले जाईल. नवीन कायदा आयकर कायदा, 1961 ची जागा घेईल. आता नवीन करप्रणालीत १२ लाखापर्यंत आयकर लागणार नाही.
करदात्यांना मोठा दिलासा मिळाला असून १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कुठल्याही प्रकारे कर आकारला जाणार नाही, अशी घोषणा यावेळी अर्थमंत्री सीतारामन यांनी केली. तसेच नवीन आयकर विधेयकामुळे गुंतागुंत कमी होणार असून मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात वाढ करणे हे नव्या विधेयकाचे उद्दिष्ट असणार आहे.तर ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएसची मर्यादा १ लाखांपर्यंत वाढवली आहे. याशिवाय आयकर भरण्याची मर्यादा ४ वर्षांपर्यंत वाढवली आहे.
दरम्यान,केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला संपूर्ण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांच्या सक्षमीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. नोकरदारवर्गाला मोठी भेट देतानाच अर्थमंत्री सीतारामन यांनी १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही, अशी घोषणा केली. त्यामुळे १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त होणार आहे.














































































