Last Updated on 05 Dec 2021 5:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. भारताने दुसऱ्या डावात 276 धावांवर डाव घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी 540 धावांचे लक्ष्य ठेवले.प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 150 धावांतच आपले पाच विकेट गमावल्या.भारतीय संघ विजयापासून 5 विकेट्स दूर आहे. तर न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी आणखी 400 धावा करायच्या आहेत.
भारताचा डाव घोषित,न्यूझीलंडसमोर 539 धावांचा डोंगर
मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीवर भारताचे वर्चस्व दिसत आहे. भारतीय संघाने डाव घोषित केला असून न्यूझीलंडच्यासमोर 539 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.









































































