कॅप्टन रोहित शर्माने ठोकल्या 60 धावा;युजवेंद्र चहल याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले
अहमदाबाद |
टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केल्यानंतर फलंदाजांनी १७७ धावांचे आव्हान संयमितपणे पार करत ६ गडी राखून विजय मिळवला.भारतीय संघाचा हा १००० वा वनडे सामना होता.
टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा डाव 43.5 षटकांत सर्वबाद 176 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने 28 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले.
भारतीय संघाची अप्रतिम गोलंदाजी
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना डब्ल्यूआय केवळ 176 धावा करू शकला आणि सर्वबाद झाला. जेसन होल्डरने (57) सर्वाधिक धावा केल्या. त्याचबरोबर भारताकडून युजवेंद्र चहलने 4 विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरनेही 3 बळी घेतले.
177 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताकडून रोहित आणि इशान यांनी उत्तम सुरुवात केली. पण अर्धशतक होताच 60 धावांवर रोहित बाद झाला. त्यानंतर इशान (28), कोहली (8), पंत (11) हे पटापट तंबूत परतले. पण नंतर सूर्यकुमार यादव (नाबाद 34) आणि दीपक हुडा (नाबाद 26) यांनी अखेरपर्यंत क्रिजवर टीकत राहून भारताचा विजय पक्का केला.
युजवेंद्र चहल याला आपल्या शानदार गोलंदाजीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मालिकेतील दुसरा सामना याच मैदानावर ९ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.
सामना सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटे मौन पाळले.
दोन्ही संघ
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, प्रसन्न कृष्णा, मोहम्मद सिराज
वेस्ट इंडिज – ब्रॅंडन किंग, शाई होप, शामर ब्रुक्स, डॅरेन ब्राव्हो, निकोलस पूरन, किरॉन पोलार्ड, जेसन होल्डर, फॅबियन ऍलन, अल्झारी जोसेफ, केमार रोच, अकील होसेन