सांगली ।
वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्व. खा. एस. डी. पाटील (साहेब) यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात संस्थेतील विशेष प्राविण्य प्राप्त गुणवंत शिक्षक म्हणून विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मराठी विषय शिक्षक प्रा विजयकुमार शंकरराव शिंदे यांचा पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या हस्ते शाल,बुके व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्रा. शिंदे यांनी २०२१ मध्ये झालेल्या सेट (शिक्षणशास्त्र) परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे,तसेच ते यापूर्वी मराठी विषयातून सेट व नेट या दोन्हीही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत,याप्रसंगी संस्थेचे मानद सचिव ॲड. बी. एस. पाटील,संस्थेचे अध्यक्ष प्रकाशभाई शहा,सहसचिव व शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य ॲड.धैर्यशील पाटील,माजी नगराध्यक्ष प्रा.सौ.अरुणादेवी पाटील,प्राचार्य संजय ढोबळे-पाटील,विभागप्रमुख प्रा.शशिकांत पाटील तसेच संस्थेचे आजी-माजी सेवक उपस्थित होते.