विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेला आपण आता सामोरे जाणार आहोत.परीक्षांचे वेळापत्रक आले आहे.सगळीकडे अभ्यासाला लाग,पास व्हायचे ना तुला! अशी वाक्य कानावर पडू लागली असणार होय ना! मग तुमचं टेन्शन वाढत असणार, तर मित्रानो घाबरू नका.या लेखातून आपण हीच तर तुमची भीती दूर करणार आहोत. परीक्षांना सामोरे कसे जायचे? आपला आत्मविश्वास कसा वाढवायचा? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यातून मिळणार आहेत.
ती मिळण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे.गोष्ट आहे दोन मित्रांची. एका मित्राचे नाव असते हार्डी,तर दुसऱ्याचे स्मार्टी हार्डी नावाप्रमाणेच असतो हार्डवर्क करणारा,तर स्मार्टी स्मार्ट वर्क करणारा. दोघांना शाळेला सुट्टी लागलेली असते.एके दिवशी दोघे डोंगरावर फिरायला जायचे ठरवतात.ठरल्याप्रमाणे ते एक दिवस डोंगराजवळ पोहोचतात.डोंगराचे निरीक्षण करता करता त्यांना डोंगराच्या माथ्यावर मंदिराचे शिखर दिसते.ते दोघेही मंदिरात जाऊ या असे ठरवतात परंतु शर्यत लावून जाऊ यात असे ठरवतात. ठरल्याप्रमाणे ती शर्यतीच्या तयारीत उभे राहतात.एक दोन साडे माडे तीन म्हंटल्यावर हार्डी नावाप्रमाणेच हार्डवर्क करणारा,कष्ट करणारा लगेच पळायला सुरुवात करतो कारण त्याला पहिला नंबर काढायचा असतो. तो जिथे उभा असतो तेथून च धावत सुटतो दिसेल त्या वाटेने त्या वाटे मध्ये काटे कुटे असतात.त्यामध्ये त्याच्या पायाला काटे लागतात तो रक्तबंबाळ होतो तरीही पळत असतो, कारण त्याला त्याचे ध्येय गाठायचे असते डोंगराच्या मध्यावर गेल्यावर त्याला वाटते कि, जरा मागे वळून बघू यात आपला मित्र कुठपर्यंत आला आहे? तर तो मागे वळून बघतो तर त्याला आपला मित्र तिथेच उभा असलेला दिसतो.
त्याला आणखी हुरूप येतो कारण का तर तो मध्यापर्यंत पोचलेला असतो ना!! आता माझा पहिला नंबर येणार याची त्याला खात्री वाटते आणि तो पुन्हा पळू लागतो तिकडे मात्र स्मार्टी आहे त्याच जागेवर अजूनही उभा असतो.विद्यार्थीमित्रांनो,स्मार्टी ला पहिला नंबर काढायचा नसतो का???? तर त्यालाही काढायचा असतो पण स्मार्टी नावाप्रमाणे स्मार्टी वर्क करणारा,बुद्धीचा वापर करणारा म्हणजेच तो विचार करत असतो ध्येय गाठायचं असेल तर त्याच्या पर्यंत जाणारा मार्ग असणार तर तो मार्ग शोधू यात. म्हणजेच डोंगराच्या माथ्यावर एवढे सुंदर मंदिर जर असेल तर भाविक लोक दर्शनासाठी जात असणार आणि नक्कीच तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या असणार, तर आपण आता त्या पायऱ्यांचा शोध घेऊ यात म्हणून तो डोंगराला थोडासा वळसा घालून जातो तर त्याला पायऱ्या दिसतात. त्याला आता त्याचा मार्ग सापडला तर त्या मार्गाचा पायऱ्यांचा वापर करून तो पळायला सुरुवात करतो त्याच्या मार्गामध्ये आता काटे कुटे नसतात. एक सलग तो परत जातो आणि मंदिरा पर्यंत पोहोचतो तर तो पर्यंत हार्डी पोहोचलेला नसतो मागे वळून बघतो तर हार्डी पोहोचतच असतो.
पण विद्यार्थी मित्रांनो पहिला नंबर काढला बरे कोणी? तर स्मार्टी ने…. यावरून विद्यार्थी मित्रांनो ध्येय गाठायचे असेल तर बुद्धीचा वापर करून त्याला कष्टाची जोड देत ध्येय गाठले पाहिजे.
प्रदीर्घ काळानंतर तुम्ही परीक्षा देणार आहात त्यासाठी प्रथमतः तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ द्यावा लागेल की ज्या वेळेत तुम्ही एक दीर्घ श्वास घेऊन डोळे शांत मिटून ध्यानस्थ असल्यासारखे बसायचे आहे आणि मनाशी एक प्रश्न विचारायचा आहे नक्की मला काय करायचे आहे??? एकदा ते उत्तर सापडले की मग तुमचे ध्येय एका कागदावर लिहून ठेवायचे आहे आणि मग अभ्यासाला लागायचे आहे. त्यासाठी एक कागद व पेन घेऊन बसा आणि आज पासून • अगदी आता पासून बोर्ड परीक्षा पर्यंत किती दिवस राहिलेत आणि आपले विषय किती त्यानुसार एका विषयास किती दिवस अभ्यासाला मिळणार आहेत याचा एक तक्ता तयार करा. आणि मग एकेक विषय आपल्या बोर्ड परीक्षांचा जो प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे त्यानुसार अभ्यासा. उदाहरणार्थ अर्थशास्त्र विषयांमध्ये प्रश्न पहिला २० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न असतो.
जर तुम्ही त्या विषयातील सर्व प्रकरणांमधील प्रथम वस्तुनिष्ठ प्रश्न केलेत तर नक्कीच त्याची तुम्हाला पास होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा यानुसार तुम्ही सर्व प्रकरणांचा अभ्यास करा. त्यातही प्रत्येक प्रकरणाच्या गुणदान तक्त्यानुसार अतिशय महत्त्वाची असणारी प्रकरणे आधी अभ्यासा असा अभ्यास केलात तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला नक्कीच असे वाटेल, अरे आज माझा 20 मार्काचा अभ्यास झाला, आज माझा ४० मार्काचा अभ्यास झाला. मग बघा बरं पास होणं किती सोपं आहे. तर घाबरू नका टेन्शन घेऊ नका असंच आपलं अभ्यासाचं पावरफूल प्लॅनिंग तयार करा आणि यश मिळवा मनातील नकारात्मक विचार घालवा, वेळेचं नियोजन करा. आपल्याला माहित आहे “Time Is Money” पण मी तर म्हणेन “Time Is more than Money”.
Merit मध्ये आलेले विद्यार्थी त्याच शेवटच्या कालावधीत अभ्यासात स्पीड घेतात, जसं की, तुम्हाला मॅरेथॉन स्पर्धा माहिती असेलच, त्यात सुरुवातीला कमी स्पीड असते, ज्या वेळी शेवटी अंतर कमी राहते ध्येयाजवळ ते यायला लागतात तेव्हा ते स्पीड घेतात, आपल्यामध्ये एक प्रकारची एनर्जी निर्माण करतात व ध्येय गाठतात. तर आपल्यालाही याच कालावधीत विद्यार्थी मित्रांनो एनर्जी निर्माण करायची आणि आपले ध्येय गाठायचे आहे. नमुना प्रश्नपत्रिकांचा सराव करून मुल्यमापन ही करा. मेहनत करा मेहनतीचे फळ गोडच असते. हे लक्षात ठेवा आणि लागा तयारीला BEST OF LUCK…