मुंबई ।
थोडक्यात पण महत्वाचे
- गेल्या १ वर्ष नऊ महिन्यापासून कोरोनामुळे राज्यात बंद असलेल्या प्राथमिक शाळा सुरू होणार आहे.
- प्राथमिक शाळासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.
- राज्यात येत्या १ डिसेंबरपासून पुन्हा शाळा सुरू होणार असून मोठ्या कालावधीनंतर शाळेची घंटा वाजणार आहे.
पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता इयत्ता पहिली ते चौथीचे वर्गही ऑफलाइन सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या १ डिसेंबर पासून राज्यातील ग्रामीण, शहरी भागांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीचे वर्गही सुरु होणार आहेत.यासंदर्भात लवकरच आवश्यक ती करोना नियमावली जाहीर करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक पार पडली.या बैठकीत राज्यात १ ते १२ वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनामुळे शाळा बंद होत्या. अखेर सरसकट शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा सुरु होत्या. दरम्यान, आता ग्रामीण भागात पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
पल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय मात्र तूर्त ऐच्छिक असणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती केली जाणार नाही. पहिली ते चौथी या वर्गातील मुले लहान असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी प्रामुख्याने शाळांवर असणार आहे. शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक आणि शालेय प्रशासनाला यासंदर्भातले योग्य ते आदेश देण्यात येणार आहेत.