नवी दिल्ली ।
संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग (इडब्ल्यूएस) या वर्गातून येणाऱ्या सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांना महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सरकारी सेवेची तयारी करणाऱ्या किंवा भर्तीसाठी अर्ज करणाऱ्या या तरुणांना मदत करण्यासाठी यूपीएससीने टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे.
हा टोल फ्री क्रमांक आहे – 1800118711, याच्या मदतीने उमेदवार कोणत्याही समस्येशी संबंधित मदत मिळवू शकतात.देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात अमृत महोत्सवाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या हेल्पलाइनद्वारे अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (इडब्ल्यूएस) आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना यूपीएससी परीक्षेसाठी अर्ज करण्यात कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागत असेल तर ते मदत मिळवू शकतात.