बोरगाव नवेखेड रस्त्यावर आंदोलन, ट्रॅक्टर टायरमधील हवा सोडली
सांगली । हुतात्मा सहकारी साखर कारखाना वाळवा कारखान्याकडून ऊसदर जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज नवेखेड बोरगाव रस्त्यावर येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरना अडवून टायरमधील हवा सोडण्यात आली. जाहीर करा,अन्यथा ऊस थांबवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
सांगली जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी हंगाम सुरू करताना ऊस दर जाहीर केला आहे. मात्र हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने अद्याप दर घोषित केलेला नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. जिल्हाधिकारी सांगली यांनी १२ नोव्हेंबरपर्यंत सर्व साखर कारखान्यांनी दर जाहीर करावा, असा अल्टिमेटम दिला होता; तरीही कारखान्याने तो आदेश पाळलेला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता वाहने अडवून टायर मधील हवा सोडण्याचा थेट कृतीचा मार्ग अवलंबला आहे.
आज सायंकाळी बोरगाव-नवेखेड रस्त्यावर येथील दहा ते बारा ट्रकर मधील हवा सोडण्यात आली. कारखान्याकडे निघालेल्या ट्रॅक्टर थांबवून हवा सोडण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चिरमुरेच्या भावात ऊस देऊ नये. थोडी कळ सोसा. उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळवून देऊ.
भागवत जाधव
नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना
Recent Posts
बातमी शेअर करा : सांगली । आजच्या युगात मुले संवेदनाशून्य होत चाललेली आहेत.त्यांच्यावर वेळीच योग्य ते संस्कार होणे गरजेचे आहे. आपणही कधीतरी वृध्द होणार आहोत याची जाणीव होणे आवश्यक आहे.त्यासाठी... Read more











































































