सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम सन २०२५-२६ मध्ये कारखान्याच्या साखराळे,वाटेगाव- सुरूल व कारंदवाडी युनिटकडे गाळपास येणाऱ्या ऊसास प्रतिटन रुपये ३५०० दर निश्चित केलेला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस आपल्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्यास गाळपास पाठवून सहकार्य करावे,असे आवाहन राजारामबापू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांनी केले आहे.
गेला गळीत हंगाम हा ऊसाच्या टंचाईमुळे १०० दिवसाच्या आत संपला आहे. त्यामुळे साखर कारखानदारीसमोर काही आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्र सरकार येत्या काही दिवसात साखरेचा किमान विक्रीचा दर वाढविणार अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात इथेनॉलचे दर वाढविले नाहीत. येत्या काही दिवसात इथेनॉलचे दरही एफआरपीच्या प्रमाणात वाढविणे अपेक्षित आहे. याशिवाय साखरेचा उतारा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त राहू शकतो,असे गृहीत धरून आपण रुपये ३५०० प्रतिटन दर निश्चित केलेला आहे.
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने गेल्या ५०-५५ वर्षीच्या कारकिर्दीत उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम जपली आहे. आम्ही नेहमी ऊस उत्पादक शेतकरी व साखर कामगारांच्या हिताला सातत्याने प्राधान्य दिले आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने राज्य व राष्ट्रीयस्तरावरील अनेक पुरस्कार मिळविले आहेत. आम्ही गेल्या काही वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवित आहोत. आम्ही क्षारपड जमीन सुधारणा, ठिबक सिंचन, कुसुमताई प्रोत्साहन योजना आदी अनेक शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवित आहोत. या योजनांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचाही तितकाच प्रतिसाद मिळत आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा : सांगली । आजच्या युगात मुले संवेदनाशून्य होत चाललेली आहेत.त्यांच्यावर वेळीच योग्य ते संस्कार होणे गरजेचे आहे. आपणही कधीतरी वृध्द होणार आहोत याची जाणीव होणे आवश्यक आहे.त्यासाठी... Read more











































































