सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना यावर्षीचा १९.५० टक्के दिवाळी बोनस देत आहोत. ही एकूण रक्कम १० कोटी ७१ लाख ९६ हजार इतकी होते. अशी माहिती राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी दिली.यावेळी साखर कारखान्यातील कामगारांनी आपला आनंदोत्सव साजरा करून कामगार युनियन च्या वतीने प्रतिकदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी कामगार युनियनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण,कार्याध्यक्ष तानाजीराव खराडे यांच्या शी चर्चा करून संचालक मंडळाच्या मान्यतेने १९.५० टक्के दिवाळी बोनसचा देण्याचा निर्णय घेतला. याप्रसंगी कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, चिफ अकौंटंट संतोष खटावकर, एचआर मॅनेंजर अनिल पाटील, कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रतिकदादा पाटील म्हणाले,साखर कारखान्यातील कर्मचारी हे आमच्या परिवाराचा एक घटक आहेत. लोकनेते राजारामबापू पाटील यांचा आदर्श आणि माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामगारांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.









































































