मा. जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात विक्रमी गर्दी; कलारसिकांनी दिला जबरदस्त प्रतिसाद
युवा नेते प्रतीकदादा पाटील यांच्या पुढाकाराने साकारला लोकसंस्कृतीचा सोहळा
छत्रपतींच्या स्वराज्याचे तोरण, वाघ्या-मुरळी, धनगरी ओव्या यांचा संगम
ढोल, ताशे, मृदंग आणि डफच्या तालावर रंगली लोककलेची पर्वणी
सांगली । कला रसिकांच्या विक्रमी गर्दीच्या साक्षीने उरूण इस्लामपूर येथील मा. जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात लोककला आणि लोक संस्कृतीचा जागर करणारे “द फोक आख्यान” मोठ्या उत्साहात पार पडले. गण,छत्रपतींच्या स्वराज्याचे तोरण,वाघ्या मुरळीची गाणी, जात्यावरची गाणी,धनगरी ओव्या,गोंधळ आणि त्याला हलगी-घुमके,टाळ-ढिमडी,विणा -मृदंग, ढोल-तासे, ढोलकी,डफ अशा रन वाद्यांच्या अविट तालाची साथ असा हा ऊर्जा, शक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम सोहळा युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या पुढाकाराने संपन्न झाला..
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील, युवा नेते प्रतिकदादा पाटील, तसेच राजारामबापू समूह आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि खचाखच भरलेल्या नाट्यगृहाने हे आख्यान पाहिले,ऐकले आणि अनुभवले.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. मराठमोळ्या,लोककलेच्या आणि संस्कृतीच्या नऊ प्रकारच्या लोक गीतांना आणि कथांना जोडणारा हा सोहळा ठरला..कार्यक्रमाची सुरुवात गणाने करण्यात आली. तिसरी माळ ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या घाटोळीने घातली. यावेळी “स्वराज्याचे तोरण बांधले शिवबा राजाने, हे गीत आणि हलगी घुमक्या च्या ठेक्याच्या साथीला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. यानंतर जात्यावरची गाणी, वाघ्या-मुरळीची जेजुरीच्या खंडेराया..येळकोट येळकोट जय मल्हार ही गाणी झाली. यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शाहिरी डफ, ढोलकी आदी रणवाद्यांच्या अप्रतिम गजर करण्यात आला.
शेवटची शिलांगणाची माळ गुंफताना लमान बंधूने व्यक्त केलेली खंत,कलारसिक अंतर्मुख करणारी ठरली. ते म्हणाले,आपण जगाचे अनुकरण करताना लोककला आणि संस्कृती विसरत चाललो आहे. आपली लोककला आणि संस्कृती गतप्राण होत चालली आहे. आता लोककला आणि संस्कृतीची तिरडी सजवायची का परडी,हे तुमच्या हातात आहे. काही वेळा मराठी भाषेला समृद्धीचा साज चढविणारी कोडी घालून कला रसिकांना बोलते करण्यात आले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला,मात्र १८ हजार जिल्हा परिषद शाळा बंद केल्या आहेत. त्याचे काय? असा प्रश्नही करण्यात आला. तीन तासाच्या या बहारदार कार्यक्रमाचा समारोप उत्कृष्ठ गोंधळाने करण्यात आला.
पी.आर.पाटील, प्रा.शामराव पाटील, देवराज पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, संग्राम फडतरे, माणिक पाटील, शशिकांत पाटील, विशाल शिंदे,अरुणादेवी पाटील, सुस्मिता जाधव, सुनिता देशमाने, आनंदराव मलगुंडे, सुरेंद्र पाटील, आनंदराव नलवडे, बाळासाहेब पवार, सुभाषराव सुर्यवंशी, खंडेराव जाधव, संदीप पाटील यांच्या सह हजारो कलारसिक या आगळ्या- वेगळ्या आख्यानाचे साक्षीदार ठरले.
आख्यान”चे कलाकारही भारावले
आम्ही पुणे-मुंबईसह संपूर्ण देशात ६० कार्यक्रम केले. आम्हास मराठी माणसांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मात्र आज आपण इतक्या विक्रमी संख्येने आणि उत्साहाने जो प्रतिसाद दिला आहे,तो आम्ही कधीही विसरू शकत नाही,अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली.









































































