गटविकास अधिकारी आर. बी. पांढरे यांची बदली
सांगली । वाळवा पंचायत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. बी. पांढरे यांची बदली झाली आहे. वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून डॉ. आबासाहेब पवार यांची पुन्हा नव्याने नियुक्ती झालेली आहे.
आर. बी. पांढरे यांची वाळवा पंचायत पंचायत समिती येथून माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे. डॉ. आबासाहेब पवार यांची सहा महिन्यापूर्वीच माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली होती. सहा महिन्यानंतर पुन्हा डॉ. पवार यांची वाळवा पंचायत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
डॉ. पवार यांचे पशु वैद्यकीय शास्त्रात एम.व्ही.एस.सी. (M.V.Sc.) शिक्षण झालेले आहे. २००१ च्या बॅचमधील एमपीएससी मधून निवड झालेली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, शाहूवाडी, कागल, सातारा जिल्ह्यातील कराड आणि वाळवा येथे गटविकास अधिकारी या पदावर कामकाज केलेले आहे.डॉ. पवार हे यापूर्वी इस्लामपूर येथे असताना त्यांच्या कार्यकाळात पर्यावरण संवर्धन, भरारी प्रकल्प शिक्षण विभाग, वृक्षलागवड किमान १ लाख, गुणवत्ता पुर्ण शाळा, जलतारा/जलव्यवस्थापन, पाणंद रस्ते, स्वयंपुर्ण व समृद्ध गाव, शेतकरी समृद्ध केळी लागवड द्राक्ष लागवड, बचत गट कर्ज पुरवठा, महीला सक्षमीकरण, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, नावीन्य पुर्ण शाश्वत विकास आदी महत्वपूर्ण कामे झाली आहेत.