सांगली । रेठरेधरण येथील एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये आज सकाळचं वातावरण काहीसं वेगळं आणि खास होतं. माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत यांनी आज शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मिसळपावचा आस्वाद घेत एक अनोखा अनुभव शेअर केला. नेहमीच्या योगा-व्यायामानंतर त्यांनी शाळेत येत लहानग्यांबरोबर सकाळचा नाश्ता घेतला आणि आपल्या सोशल मिडिया पोस्टमधून या गोड क्षणांचे शब्दांतून चित्र रंगवले.
गेल्या काही दिवसांपासून शाळा सुरू असून विविध राज्यांतील विद्यार्थी शिक्षणासाठी येथे दाखल झाले आहेत. याच मुलांबरोबर आजचा नाष्टा घेताना आ. खोत यांनी त्या क्षणाचं भावनिक आणि आत्मीय वर्णन केलं.
“मुलांबरोबर मिसळपाव खाणं हा नुसता नाश्ता नव्हता, तो प्रेमाचा आणि आपुलकीचा अनुभव होता”, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतून व्यक्त होणाऱ्या आनंदाचं निरीक्षण करताना, “मोठे सर आमच्यासोबत नाष्टा करत आहेत!” हे अप्रूप खोत यांना जाणवलं. आपल्या पालकांपासून दूर शिक्षणासाठी आलेल्या या मुलांनी आता शाळेला कुटुंब मानलं असल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला.
“या मुलांवर प्रेम करायला, त्यांच्यासोबत हास्य-विनोद करायला आणि त्यांच्या निरागसतेत स्वतःला हरवून जायला मिळणं, हेच माझं खरं भाग्य आहे,” अशा शब्दांत खोत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जबाबदारी पार पाडताना, त्यांनी विद्यार्थ्यांशी निर्माण केलेलं नातं केवळ प्रशासकीय नसून खऱ्या अर्थाने पालकत्वाचं प्रतिबिंब असल्याचं या प्रसंगातून अधोरेखित झालं.
Recent Posts
बातमी शेअर करा : मुंबई | माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख (वय ५५ वर्षे) यांचे शनिवारी (दि.१२) हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने न... Read more