विश्वास धस, धनंजय पाटील, अशोक पाटील उपाध्यक्ष
तालुका संघटक पदी बजरंग कदम यांची निवड
सांगली । वाळवा तालुका सहकार भारतीच्या अध्यक्षपदी कासेगावचे पांडूरंग वाघमोडे यांची तर विश्वास धस,धनंजय पाटील व अशोक पाटील यांची उपाध्यपदी निवड झाली.
प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध अर्थतज्ञ प्राचार्य डॉ. पी. बी. कुलकर्णी, सहकार भारतीचे प्रदेश संपर्क प्रमुख संजय परमणे,प्रदेश प्रतिनिधी सौ.अश्वीनी आठवले उपस्थित होते. अध्यक्षस्थान सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष सुमंत महाजन यांनी भूषविले.
श्री दत्त नागरी पत संस्थेच्या स्व.जी.एस.कुलकर्णी सभागृहात वाळवा तालुक्याची कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली .संजय विभूते यांनी स्वागत व प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.यावेळी दत्त पत संस्थे मार्फत सर्वांचे यथोचित सत्कार करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष सुमंत महाजन यांनी तालुक्याची कार्यकारिणी जाहिर केली ती या प्रमाणे,
अध्यक्ष- पांडुरंग वाघमोडे ( कासेगाव), उपाध्यक्ष- सर्वश्री विश्वासराव धस (इस्लामपूर), अशोकराव पाटील (वशी), धनंजय पाटील (कामेरी ), संघटन प्रमुख – बजरंग कदम (घबकवाडी) सचिव -अक्षय पिसे (इस्लामपूर) सह.सचिव दिलीप सांडगे (मरळनाथपूर), सह.सचिव – शिवाजी राजाराम पाटील (कुरळप), कार्यालय प्रमुख – संजय विभूते (शिवपूरी), सहा.कार्यालय प्रमुख – सचिन देसाई, तालुका महिला प्रमुख स्वरा कामेरीकर (इस्लामपूर), कार्यकारिणी सदस्य – दिलीप जाधव (कामेरी), सुरेश माने (इस्लामपूर), उदय देसाई (इस्लामपूर), सौ.अपर्णा मंत्री (इस्लामपूर), सांगली जिल्हा सुतगिरणी प्रकोष्ठ डॉ. शिवाजीराव जाधव, जिल्हा साखर कारखाना प्रकोष्ठ अशोक पाटील (कोकरूड) या प्रमाणे कार्यकारिणी ची निवड करण्यात आली. या वेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सुमंत महाजन म्हणाले की, येत्या काळात नवीन पदाधिकार्यानी जिथे सहकारी संस्था तिथे सहकार भारती यासाठी प्रयत्न करावेत.तसेच लवकरच सदस्य नोंदणी सुरू होणार आहे वाळवा तालुक्यातुन ५०० सदस्य करावे असे आवाहन केले. सुत्रसंचलन व आभार तालुका संघटन प्रमुख बजरंग कदम यांनी केले.