१२ ते १४ मे दरम्यान मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण आणि होमहवन
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
सांगली । बहे (ता. वाळवा) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण व होमहवनाचा भव्य कार्यक्रम १२ ते १४ मे दरम्यान पार पडणार आहे. मंदिराचे जिर्णोद्धाराचे कार्य पूर्णत्वास आल्याने हा मंगल सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात १२ मे रोजी सकाळी ७ वाजता नवीन मूर्तींची पूजा होईल. दुपारी ४ वाजता मूर्ती व कलशाची गाव प्रदक्षिणा काढण्यात येईल. १३ मे रोजी सकाळी ७ वाजता महाहोम हवन होणार असून, १४ मेला सकाळी ७ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण, आरती व महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले आहे.
गावातील महिला वर्ग, तरुण, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठा सहभाग असून, गावातील सर्व थरांतून या सोहळ्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ग्रामदैवताच्या नूतन मूर्ती स्थापनेचा हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सव्वा महिना मांसाहार वर्ज्य
धार्मिक कार्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने गावातील सर्व मांसाहार विक्रेत्यांना १२ मे ते २१ जुन २०२५ या कालावधीत मटन, चिकन, मासे व चिकन ६५ यांची विक्री पूर्णतः बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. गावातील सर्व व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी यास सहकार्य करून परंपरेप्रमाणे उत्सव साजरा करण्यास मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
असा पार पडेल धार्मिक सोहळा :
१२ मे (सोमवार):
सकाळी ७ वाजता नवीन मूर्तींची पूजा
सायंकाळी ४ वाजता मूर्ती आणि कलशाची गाव प्रदक्षिणा
१३ मे (मंगळवार):
सकाळी ७ वाजता महाहोम हवन
१४ मे (बुधवार):
सकाळी ७ वाजता प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण, आरती आणि महाप्रसाद