Last Updated on 28 Apr 2025 3:40 PM by Sanjay Patil/Adhorekhit

आजच्या विद्यार्थ्यांसाठी उद्याचे यशस्वी भवितव्य घडवणारी शाळा : गुणवत्तापूर्ण शिक्षणाची खात्री
सांगली । विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, इस्लामपूर येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी इयत्ता ५ वी ते १० वीच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या या संस्थेने यशाची घोडदौड कायम राखली आहे.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेत सन २०२५ मध्ये १९ विद्यार्थ्यांनी यश मिळवून प्रत्येकी ९ हजार ६०० रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. तसेच, सन २०२४ च्या एस.एस.सी. परीक्षेत शाळेचा निकाल ९८ टक्के इतका उज्ज्वल लागला आहे.
शाळेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणून विद्यार्थ्यांना आधुनिक व अद्ययावत शिक्षणपद्धतीसह JEE, NEET, CET स्पर्धा परीक्षांसाठी विशेष तयारी करून दिली जाते. विज्ञान व डिजिटल शिक्षणावर भर देत विद्यार्थ्यांचा बौद्धिक तसेच शारीरिक विकास साधण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. तसेच, क्रीडा, संगीत, नृत्य, योगा व कलाकौशल्य यांचे विशेष प्रशिक्षणही दिले जाते.
विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने दर्जेदार शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य निर्माण व संस्कारक्षम समाजनिर्मितीवरही भर दिला आहे. प्रयोगशाळा, संगणक कक्ष, समृद्ध वाचनालय आणि प्रशस्त मैदाने ही संस्थेची बलस्थाने आहेत.
संस्थेचे मानद सचिव ॲड. बी.एस. पाटील, सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचा शैक्षणिक व सर्वांगीण विकास साधला जात आहे. इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानामध्ये सलग दुसऱ्या वर्षी बाजी मारून ‘वाळवा तालुक्यामध्ये प्रथम’ क्रमांकाची शाळा होण्याचा बहुमान पटकाविला. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात या अभियानामध्ये विद्यामंदिर हायस्कूलने वाळवा तालुका प्रथम व सांगली जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक पटकविला होता. सदर शाळेस रोख रक्कम तीन लाख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले होते. तसेच सन २०२४-२५ या चालू शैक्षणिक वर्षांमध्येही या अभियानाचे मूल्यांकनाचे निकष बदलले असूनही भौतिक सुविधेबरोबर, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी संपादणूक पातळी, समाज सहभाग आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अनेक शैक्षणिक गुणवत्तापूर्ण निकष निर्धारित केले होते. या सर्व निकषांची उत्तम पूर्तता करीत तालुक्यात पुन्हा एकदा प्रथम क्रमांक पटकावून विद्यामंदिर हायस्कूलने आपली गुणवत्ता व दर्जेदारपणा सिद्ध केला आहे. या यशाबद्दल शासनाकडून मिळणाऱ्या रोख रक्कम तीन लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र यास पात्र ठरली आहे.
प्रवेशासाठी संपर्क:
श्री. एस. एल. पाटील (मुख्याध्यापक)
मो.: ९८८१९७९१५० / ९९७५३७७६९० / ८७८८३६५७२०
![]()











































































