सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगार कल्याण व जिमखाना समितीच्या अध्यक्षपदी डॉ.सौ. योजना शिंदे-पाटील यांची निवड करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतीक पाटील यांच्या संकल्पनेतून ही समिती नव्याने निर्माण करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून कामगारांचे हित, सुरक्षा,खेळ व आरोग्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. डॉ.योजना शिंदे-पाटील या राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या व्हॉलीबॉल संघाचे नेतृत्वही केले आहे.
कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील यांच्या हस्ते डॉ.योजना शिंदे-पाटील यांचा सत्कार करण्यात आला. माजी जि.प.अध्यक्ष व माल खरेदी समितीचे अध्यक्ष देवराज पाटील,शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील, जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील,उपपदार्थ व अभिनव उपक्रम समिती चे अध्यक्ष अतुल पाटील,ऊस विकास समिती चे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,कामगार नेते शंकरराव भोसले, तानाजीराव खराडे, कामगार प्रतिनिधी मनोहर सन्मुख प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा – वाळवा तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर…
“माजी मंत्री आ.जयंत पाटील, कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यातील कामगारांच्यासाठी सोई-सुविधा उपलब्ध करून देताना त्यांची सुरक्षा जपणे,त्यांच्या कामाचा दर्जा वाढविणे, खेळ व आरोग्यास प्राधान्य देवण्याचे काम करू,अशी भावना डॉ.योजना शिंदे पाटील यांनी दिली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांच्या सह सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील,मनुष्यबळ विकास अधिकारी अनिलकुमार पाटील,अर्कशाळा व्यवस्थापक धैर्यशिल पाटील,मुख्य लेखापाल संतोष खटावकर,ऊस विकास अधिकारी सुजय कुमार पाटील,जलसिंचन अधिकारी जे.बी. पाटील यांच्यासह कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.