सांगली । वाळवा तालुक्यातील सन २०२५ ते २०३० दरम्यान सार्वत्रिक निवडणूक द्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण सोडत आज काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढून ग्राम पंचायत निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले.
९४ ग्रामपंचायतीच्या व थेट जनतेतून निवड होणाऱ्या सरपंच पदाची आरक्षण सोडत इस्लामपूर येथील राजारामबापू नाट्यगृहात सकाळी ११ वाजता पार पडली. गाव पातळीवरील ग्रामपंचायत सरपंच पद हे अतिशय महत्त्वाचे असल्याने या आरक्षण सोडतीकडे मानोरा तालुक्यातील गाव पातळीवरील राजकारणाचे लक्ष लागले होते. दरम्यान, थेट जनतेतून सरपंच पदाची निवड असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या विविध राजकीय नेते मंडळीची उपस्थिती कमी जाणवली.
आजच्या सरपंच पदाच्या सोडतीनंतर अनेकांचा भ्रमनिरास झाला तर अनेकांना याची लॉटरी लागली. अपेक्षेप्रमाणे सरपंचपद आरक्षित झाले त्या गावातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे..मात्र अपेक्षेप्रमाणे सरपंचपद आरक्षित न झाल्याने काही गावातील कार्यकर्त्यांमध्ये भ्रमनिरास झाल्याचे चित्र आज दिसून आले.
गावनिहाय पडलेले आरक्षण असे : (महिला ५० टक्के आरक्षण)
अनुसूचित जाती – ११ (६)
अनुसूचित जमाती – १ (०)
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – २६ (१३)
खुल्या जागेसाठी – ५६ (२८)
अनुसूचित जाती :
काळमवाडी, गोंडवाडी, मर्दवाडी, लवंडमाची, वाघवाडी
अनुसूचित जाती- महिला :
कारंदवाडी, पडवळवाडी, विठ्ठलवाडी, ढगेवाडी, साटपेवाडी, जुनेखेड
अनुसूचित जमाती :
कापूसखेड
नागरिकांचा मागास प्रवर्ग :
भडकंबे, लाडेगांव, बागणी, नागांव, कणेगांव, कोरेगांव, मालेवाडी, शेणे, बेरडमाची, काकाचीवाडी, केदारवाडी, फाळकेवाडी, घबकवाडी
नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला :
पोखर्णी, रेठरेधरण, शिरटे, ओझर्डे, कामेरी, मिरजवाडी, नेर्ले, ठाणापुडे, चिकुर्डे, शिरगांव, इटकरे, फार्णेवाडी (शि.), जक्राईवाडी
सर्वसाधारण :
ताकारी, नरसिंहपूर, बिचूद, कासेगांव, साखराळे, तांदुळवाडी, बावची, येडेनिपाणी, वाटेगांव, किल्लेमच्छींद्रगड, रेठरेहरणाक्ष, शिगांव, नवेखेड, गोटखिंडी, हुबालवाडी, बनेवाडी, भाटवाडी, कुंडलवाडी, येडेमच्छिंद्र, भवानीनगर, खरातवाडी, मसूचीवाडी, गाताडवाडी, डोंगरवाडी, येवलेवाडी, शिवपूरी, शेखरवाडी, भरतवाडी
सर्वसाधारण – महिला :
कोळे, कार्वे, देवर्डे, कुरळप, ऐतवडे बु., बहे, सुरूल, तुजारपूर, ऐतवडे खु., वशी, पेठ, करंजवडे, दुधारी, बोरगांव, येलूर, रोझावाडी, तांबवे, ढवळी, बहादुरवाडी, वाळवा, माणिकवाडी, फार्णेवाडी बो., अहिरवाडी, महादेवाडी, मरळनाथपूर, धोत्रेवाडी, नायकलवाडी, जांभुळवाडी