शनी, शुक्र आणि चंद्र एका रेषेत; काही राशींना संधी, काहींना सावधगिरीचे संकेत
एप्रिल महिन्याच्या अखेरीस (25 एप्रिल 2025) रोजीआकाशात एक विलक्षण दृश्य पाहायला मिळणार आहे. चंद्र, शुक्र आणि शनी या तीन प्रभावशाली ग्रहांची दुर्मिळ युती (त्रिग्रही संयोग) काही तासांसाठी दिसणार असून, खगोलप्रेमी आणि ज्योतिष अभ्यासकांसाठी ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
ही युती सूर्योदयापूर्वी दोन तास अगोदर पश्चिम क्षितिजावर काही वेळ पाहता येणार असून, यामुळे केवळ आकाशातील दृश्यच नवल निर्माण करणार नाही, तर याचे ज्योतिषशास्त्रीय दृष्टीनेही विविध राशींवर परिणाम जाणवणार आहेत.
काय घडणार आहे आकाशात?
शनी हा धीमेगतीचा पण प्रभावशाली ग्रह, शुक्र हा आकर्षण व संपत्तीचा कारक, तर चंद्र हा भावनांचा प्रतिनिधी. हे तिन्ही ग्रह एकाच अंशात किंवा खूप जवळ एकत्र येतात तेव्हा त्या काळात भावनिक, आर्थिक आणि सामाजिक पातळीवर घडामोडी वेग घेतात, असं जाणकारांचं म्हणणं आहे.
राशीनिहाय परिणाम :
मेष, सिंह, मकर आणि तुला राशींवर या युतीचा अधिक प्रभाव दिसून येईल.
-
मेष : जुने निर्णय पुन्हा तपासावे लागतील. मानसिक द्वंद्व असू शकते.
-
सिंह : कुटुंब व नातेसंबंधात सकारात्मक वळण. कला, साहित्य क्षेत्रात संधी.
-
मकर : नोकरी-व्यवसायात नवे बदल. आत्मविश्वास वाढेल, पण आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
-
तुला : आर्थिक व्यवहारात संधी, पण मन अस्थिर राहण्याची शक्यता.
इतर राशींनाही या युतीमुळे सौम्य परिणाम जाणवतील. काहींना नवे विचार सुचतील, काहींना जुन्या गोष्टींचा पुनर्विचार करावा लागेल.
धार्मिक आणि आध्यात्मिक संदर्भ:
शनीच्या उपस्थितीमुळे कर्मावर परिणाम होताना दिसेल, शुक्रामुळे नातेसंबंधांमध्ये वेगळा कल दिसेल आणि चंद्राच्या सहभागामुळे भावनिक निर्णयांना धार येईल. त्यामुळे सोमवार (चंद्र), शुक्रवार (शुक्र) आणि शनिवार (शनी) या दिवशी खास पूजन, दान आणि प्रार्थना केल्यास मनःशांती व समतोल मिळू शकतो, असं अनेक जाणकार सुचवतात.
(टीप : या प्रकारच्या युतीकडे केवळ अंधश्रद्धेच्या नजरेने न पाहता, ती एक आत्मपरीक्षणाची संधी म्हणून घ्यावी. बदल स्वीकारण्याची आणि आपले कर्म अधिक सकारात्मकतेने घडवण्याची ही एक योग्य वेळ असू शकते.)