शिवपूजन विशेष महत्त्व मध्यरात्री – 24:27 ते 25:16
माघ वद्य चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्र होय .
चतुर्दशीस निशीथकाली (रात्री) शिवपूजन करणे ही या व्रताची मुख्य अंग आहेत.
कामदं मोक्षदमं चैव..!
कामदम म्हणजे आहिक सुख आणि मोक्षदम म्हणजे पारमार्थिक सुख – या दोन सुखाचा समन्वय माणसाच्या जीवनात असेल तर माणसाचे जीवन सुखमय -समृद्ध आणि आनंदी होऊन मोक्षाकडे वाटचाल होते.
जसं ब्रह्म्याकडे निर्मितीचे तत्व दिलेला आहे ,विष्णूकडे स्थितीचे तत्व , तर शिवाकडे लयाचे तत्व …!
या रहाटगाट्यातून मुक्त व्हायचं म्हटलं तर शिवाची उपासना सर्वश्रेष्ठ उपासना शास्त्रात सांगितलेली आहे आणि शिव उपासने साठी महाशिवरात्रीच्या पूजनाचे महत्त्व विशेष आहे.
प्रारंभी …मम इहजन्मनि जन्मान्तरेषु च वृत्त-वर्तमान-वर्तिष्यमाणानां नानाविधदुरितानां समूलं निरसनपूर्वकं कामादि-षड्रिपुनाशपूर्वकं सन्मति-धर्मप्रीति-सदाचार सत्प्रवृत्ति-ईशभक्ति-अदम्भता-सिद्धयर्थं अन्ते शिवसायुज्य-प्राप्त्यर्थं अनशन-पूजन-निशीथकाल-बिल्वार्पण-जागरण-पूर्वकं कल्पोक्तविधिना श्रीमहारुद्र-महामृत्युञ्जय भवांनीशङ्करदेवता-प्रीत्वर्थ-महाशिवरात्रीव्रतं करिष्ये ।।’ असा संकल्प करून दिवसा महिम्न, रुद्र, शिवाथर्वशीर्ष ईत्यादि स्तोत्रांनी शिवास महाभिषेक करावा. त्याचप्रमाणे शिवलीला, स्कन्दपुराण, शिवस्तुती, शिवकवच, शिवसहस्रनामावली इत्यादि ग्रंथांचे पारायण करावे. ‘ॐ नमः शिवाय’ या षडक्षरी, ‘नमः शिवाय’ या पंचाक्षरी किंवा
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
या मृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा.
रात्री शक्य तितक्या संख्येने शिवाच्या पिंडीवर बिल्वार्पण (बेल वहाणे) करावे.निर्माल्य व तीर्थ अग्राह्य असले तरी स्वयंभू लिंग असेल तर ते तीर्थ ग्राह्य होते.
गोकर्ण काशी वगैरे प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगे आहेत त्या ठिकाणी तर या दिवशी मोठा उत्सव होतो.
कपिलाषष्ठी ,अर्धोदय ,संक्रात महोदय , गजच्छाया व ग्रहण या सर्व सर्व काळापेक्षाही महाशिवरात्रीचे महत्त्व विशेष आहे.
महाशिवरात्र प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात शिवरात्र व्रत असते. परंतु काही पौराणिक कथांमध्ये माघ महिन्यातील शिवरात्रीचे महत्त्व विशेष सांगितले असल्यामुळे या शिवरात्रीस ‘महाशिवरात्रि असे म्हटले जाते. प्रत्येक महिन्याची शिवरात्रि न करणारे भक्त देखील महाशिवरात्रीचे व्रत करताना दिसतात.
संपूर्ण भारतामध्ये महादेव मंदिरात महाशिवरात्रि निमित्त मोठा उत्सव होत असतो . निशीधकाळी (मध्यरात्री) असलेल्या चतुर्दशीचे दिवशी शिवरात्रि व्रत करावयाचे असते.
ईशान संहितेतील ‘शिवलिंगतयोद्भूतः कोटिसूर्यसमप्रभः।’ या वचनानुसार माघ वद्य चतुर्दशीच्या मध्यरात्री ज्योतिर्लिंग प्रगट झाले असल्यामुळे त्या शिवरात्रीला ‘महाशिवरात्रि’ म्हणले जाते.
महाशिवरात्रीचा पारणा दुसऱ्या दिवशी सकाळी असतो. तत्पूर्वी विष्णू विष्णु पूजन केले जाते.
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तु सल्लागार आहेत)