गुण पडताळणीसाठी ऑनलाईन करावेत
हिंगोली | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत संगणक टंकलेखन (GCC-TBC) परीक्षा ही दिनांक 1 ते 24 डिसेंबर, 2024 मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल दिनांक 4 फेब्रुवारी, 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर सायंकाळी 5 नंतर उपलब्ध होईल.
विद्यार्थ्यांना गुणपत्रकाची ऑनलाईन प्रिंट घेता येईल. विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे, गुणपत्रके डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन स्वरुपात संबंधीत संस्थांच्या लॉगीनला उपलब्ध करून देण्यात येतील. प्रमाणपत्रांची छपाई संस्थांनी कलर प्रिंटद्वारे 100 जीएसएम कागदावर करुन विद्यार्थ्यांना वितरीत करावे. तसेच संबंधित विद्यार्थ्यास सॉप्टकॉपी (पीडीएफ) स्वरुपात देण्यात यावी. जेणेकरुन विद्यार्थ्यांना भविष्यात प्रमाणपत्राच्या आवश्यकतेनुसार सदरील प्रमाणपत्र कलर प्रिंटद्वारे छपाई करून घेता येईल.
संस्थांनी संबंधित विद्यार्थ्यास प्रमाणपत्र, गुणपत्रके वितरीत केलेली पोहोच दप्तरी जतन करून ठेवावी. निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून 10 दिवसात परीक्षार्थीने गुण पडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी संस्थेतून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय 100 रुपये प्रमाणे व छायाप्रती मिळण्यासाठी प्रति विषय 400 रुपये प्रमाणे रक्कम ऑनलाईन पध्दतीने दिनांक 13 फेब्रुवारी, 2025 पर्यंत भरावी. गुणपडताळणी व छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन पाच दिवसात पुनर्मुल्यांकनासाठी प्रती विषय 600 रुपयाप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने रक्कम भरुन अर्ज करावेत, याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा : जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांची माहिती सांगली : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये सन 2024-25 या आर्थिक वर्षात सांगली जिल्ह्याती... Read more