जीवा शिवाची बैल जोड, ढीपाडी ढिपांग ते झिंगझिंगाटने कलारसिक मंत्रमुग्ध
सांगली । मराठमोळ्या नचिकेत लेले या आघाडीच्या युवा गायकाने बहारदार हिंदी-मराठी गाणी सादर करीत इस्लामपूरच्या कला रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्याला युवा गायिका अक्षता सावंत हिने साथ दिली. आविष्कार कल्चरल ग्रुपने ‘नचिकेत लेले लाईव्ह ईन कॉन्सर्ट,विथ अक्षता सावंत’या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या सह ५ हजार कला रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
देवा श्रीगणेशाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. एक चतुर नार,दर्दे दिल, कजरा रे,मन उधाण वाऱ्याला,जीवा शिवाची बैल जोड,ललाटी भंडारं,ढीपाडी ढिपांग, अश्विनी येना,पावणं जेवला का,वाट बघतो रिक्षावाला आदी हिंदी-मराठी गाणी सादर करण्यात आली. झिंगझिंगाटने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. आरजे अमित यांनी प्रभावी संचालन केले. नचिकेत लेले सारेगम विजेता आणि इंडियन आयडॉल फेम असून अक्षता सावंत हिने फुबाईफु,महाराष्ट्राची हास्य जत्रा,महाराष्ट्राची बुलेट ट्रेन आदी कार्यक्रमात गाणी गायली आहेत.
माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ताकारीचे माजी सरपंच अर्जुन पाटील,डॉ.अशोक पाटील,मजूर फेडरेशनचे संचालक संतोष पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
विनायक पाटील, प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास, विजयराव पाटील, शिवाजी आपुगडे ,उमेशदादा पवार, सुनिता देशमाने यांच्यासह वाळवा,पलूस व शिराळा तालुक्या तील कला रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. मोहनराव चव्हाण, सुनील चव्हाण, भूषण शहा, विश्वनाथ पाटसुते, विजय लाड, प्रा.कृष्णा मंडले, सतिश पाटील, नजीर शेख, डॉ.अतुल मोरे, धनंजय भोसले, सौरभ सावंत, लव्हाजी देसाई, अजय थोरात, अक्षय जाधव, आप्पा जावीर, विशाल पाटील,अक्षय पाटील यांच्यासह आविष्कारच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे सुंदर संयोजन केले.