समाज माध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये, आमदार आदिती तटकरेंचे लाडक्या बहिणींना आवाहन
मुंबई । माझ्या नावाने खोटी माहिती पसरवून काही माध्यमांकडून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, अशी विनंती आमदार आणि राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या माजी मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाकडी बहीण योजनेसंदर्भात वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहने आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. काही महिलांना यातून वगळण्यात येणार आहे, त्यांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे, अशी चर्चा होत असताना आदिती तटकरे यांनी X वर ट्विट करत तसेच facebook वर पोस्ट करत अशा कोणत्याही अफवांना बळू पडू नये, असे आवाहन केले.
आमदार आदिती तटकरे यांनी मंगळवारी काय पोस्टमध्ये काय म्हटलं?
माझ्या नावाने खोटी माहिती पसरवून काही माध्यमांकडून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना अर्थसंकल्पात योग्य प्रकारे नियोजन करून कबूल केलेल्या २१०० रुपयांच्या लाभाबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास २ कोटी ३४ लाख महिलांना लाभ मिळत आहे. ही योजना राबवत असताना सर्व लाभार्थी महिलांची पडताळणी करूनच त्यांना लाभ वितरित करण्यात आला आहे. म्हणून, सध्या नोंदणी करत असलेल्या लाभार्थ्यांच्या पडताळणीच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, अशी कोणतीही पडताळणी होणार नाही.
कृपया याबाबत कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये ही सर्वांना नम्र विनंती !
Recent Posts
बातमी शेअर करा : ‘पॅक्स’ आणि ‘एफपीओ’च्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशात २ लाख नव्या प्राथमिक कृषी पतसंस्था मुंबई | “सहकार से समृद्धी” या आधारावर ग्रामी... Read more
आज, बुधवारी काय पोस्टमध्ये काय म्हटलं?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे.
एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाज माध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती.