सांगली । इस्लामपूर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका ॲड.कोमल बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्या कामाची दखल घेतल्याचे समाधान आहे. आम्ही साहेबांना शहरातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यात योगदान करू, असा विश्वास ॲड.बनसोडे यांनी व्यक्त केला.
त्या प्रभाग ५ मध्ये विरोधी विकास आघाडीचे प्रतिनिधित्व करीत होत्या. त्या एक आक्रमक महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात.
आ.जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी ॲड.बनसोडे यांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष ॲड.चिमण डांगे,माजी नगरसेवक खंडेराव जाधव, ॲड.धैर्यशिल पाटील, माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे, माजी युवक शहराध्यक्ष सचिन कोळी, सुहास पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विजय बनसोडे,रणजित बनसोडे,कौशल सुर्यगंध, दीपक तोडकर,प्रमोद शिंदे,करण बनसोडे, रोहन बनसोडे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.