कोजागरी पौर्णिमा
दिनांक 16 ऑक्टोबर 2024
रात्री – लक्ष्मी व इंद्रपूजन
गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबर 2024
दिवसा नवान्न प्राशन प्रशन व ज्येष्ठ आपत्यास ओवाळणे
मम सकल -अलक्ष्मी परिहारपूर्वक – लक्ष्मी प्राप्त्यार्थं तथा च मम लक्ष्मी इंद्र प्रीतिद्वारा समस्त दुःख दारिद्र्य निरासपूर्वकं अस्माकं सहकुटुंबानां दीर्घायु : – आरोग्य – पुत्र – पौत्र महेश्वर्य – सुखसंपत् – अभिवृध्दि कुलाभ्युदयादि अभिष्टसिद्धार्थ कोजागर व्रताङ्गभूतं लक्ष्मी इंद्र पूजनं करिष्ये॥
असा संकल्प करून पाठावर दोन सुपाऱ्या मांडून श्री लक्ष्मी इंद्राय नमः या नाममंत्राने पूजन करावे. दुधाचा नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून द्यावे.
अश्विन महिन्यात मध्यरात्री असलेली पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा होय. या दिवशी ज्येष्ठ आपत्य व इतर मुलांनाही आरोग्य आयुष्य लाभावे यासाठी ओवाळले जाते. रात्री लक्ष्मी व इंद्राची पूजा करून, चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवून केशरीयुक्त दूध प्राक्षण केले जाते.
लेखन -प्रभाकर जंगम
पंचांगाधार- दाते पंचांग
या सणातील शास्त्रीय दृष्टिकोन पाहिलेस बऱ्याच वेळा यास आपण कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतो. पण कोजागिरी असा शब्द नसून कोजागरी असा शब्द आहे. कोजागरी म्हणजे “को जागृती “अर्थात रात्री कोण जागे आहे. मध्यरात्री चंद्र मंडलातून लक्ष्मी व इंद्र पृथ्वीवर येतात आणि जे जागे राहतील त्यांना ते धनधान्य संपत्ती देतात. अशी समजूत असल्याने लक्ष्मी व इंद्राची पूजा करून पौर्णिमेच्या चांदण्यात हा आनंद उत्सव संपूर्ण ठिकाणी साजरा होताना दिसतो.
जागृत, सुषोप्ती, स्वप्न आणि तुरीय या मनाच्या अवस्था आहेत जागृत अवस्थेत मन विश्वाच्या सतत संपर्कात असते.अर्थात जीवनात काहीतरी प्राप्त करायचे झाल्यास आपण नेहमी जागृत आणि कर्तव्यदक्ष असायला पाहिजे हा संदेश या सणातून मिळतो.
एका ठिकाणी माझ्या वाचनात असे आले की ‘या पौर्णिमेस पद्मासनात बसलेली लक्ष्मी इंद्र यांची पूजा करून दूध शहाळ्याचा नैवेद्य दाखवून, लक्ष्मीची पूजा केली जाते, कारण पैसा हलल्ला पाहिजे अगदी बरोबर पण पद्मासनात बसलेल्या लक्ष्मीच्या पूजनाने नुकतेच नवीन आलेले धन धान्य यांचे संवर्धन करा हा संदेश या सणातून देण्यात आला असावा असे मला वाटते. म्हणून कदाचित आपला शेतकरीच आपल्या शेतीत नवीन पिकवलेले धान्य या ऋतूत आपल्या खाण्याव्यतिरिक्त बाहेर काढत नसावा.
या व्रतातील विज्ञान पहिल्यास आपला देह पंच तत्वाने बनलेला आहे. पृथ्वी तेज आप वायू आकाश या पंचतत्वातील आप तत्वाचा समतोल राखण्यासाठी शाहळयाचा नैवेद्य लक्ष्मी व इंद्राला दाखवून प्राशन केला जात असावा, कारण जलरूपी पाण्याचे महत्व वेगळे आणि शहाळे आरोग्यदायी आहे. निरोगी आरोग्यासाठी आपले आयुर्वेद सांगते. शरद ऋतुचा काळ पित्त प्रकोपाचा असतो पित्त प्रकोप थांबविण्यासाठी शरीराला दुधाची आवश्यकता असते.
संगीत कार्यक्रमामुळे मनाची प्रसन्नता वाढण्यास नक्कीच मदत होते. मनाचा व पौर्णिमेच्या चंद्राचा अगदी जवळचा संबंध आहे हे आपणास समुद्राच्या भरतीच्या नियमावरून लक्षात येईल.
लक्ष्मीपूजन व देवाधिपती इंद्र पूजनाने परमार्थिक सुखाचा लाभ होण्यास नक्कीच मदत होईल.
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तुसल्लागार आहेत)
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री, वास्तुसल्लागार)
मो. 9860825993
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.