मुंबई । मे 2024 मध्ये एकूण वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) महसूल 1.73 लाख कोटी रुपये इतका होता. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत 10% वाढ दर्शवते जी देशांतर्गत व्यवहारांमध्ये (15.3 टक्के अधिक ) आणि आयात मंदावल्याने (4.3 टक्के खाली) दिसून येत आहे. परताव्याचा हिशेब दिल्यानंतर, मे 2024 चा निव्वळ वस्तू आणि सेवा कर महसूल 1.44 लाख कोटी रुपये इतका आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 6.9 टक्केनी अधिक आहे.
मे 2024 मधील संकलनाचे वर्गीकरण :
• केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST) : 32,409 कोटी रुपये;
• राज्य वस्तू आणि सेवा कर (SGST) : 40,265 कोटी रुपये;
• एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (IGST) : 87,781 कोटी रुपये, ज्यात आयात केलेल्या वस्तूंवर जमा केलेल्या 39,879 कोटी रुपये संकलनाचा समावेश आहे;
• उपकर: 12,284 कोटी रुपये, ज्यात आयात केलेल्या वस्तूंवर जमा केलेल्या 1,076 कोटी रुपये संकलनाचा समावेश आहे.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मे 2024 पर्यंत एकूण वस्तू आणि सेवा कर संकलन 3.83 लाख कोटी रुपये इतके होते. ही आकडेवारी गतवर्षीच्या तुलनेत 11.3 टक्केची वाढ दर्शवते, जी देशांतर्गत व्यवहारांमध्ये (14.2 टक्केवर) आणि आयातीतील किरकोळ वाढ (1.4 टक्के वर) यामुळे झाली आहे. परताव्याचा लेखाजोखा केल्यानंतर, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मे 2024 पर्यंत निव्वळ वस्तू आणि सेवा कर महसूल 3.36 लाख कोटी रुपये इतका आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 11.6 टक्केची वाढ दर्शवितो.
आर्थिक वर्ष 2024-25 मधील मे, 2024 पर्यंत संकलनाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:
• केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST) : 76,255 कोटी रुपये;
• राज्य वस्तू आणि सेवा कर (SGST) : 93,804 कोटी रुपये;
• एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (IGST) : 1,87,404 कोटी रुपये ज्यात आयात केलेल्या वस्तूंवर गोळा केलेल्या 77,706 कोटी रुपये संकलनाचा समावेश आहे;
• उपकर: 25,544 कोटी रुपये, ज्यात आयात केलेल्या वस्तूंवर जमा केलेल्या 2,084 कोटी रुपये संकलनाचा समावेश आहे.
आंतर-सरकारी तडजोड :
मे 2024 मध्ये, केंद्र सरकारने 67,204 कोटी रुपये जमा केलेल्या निव्वळ एकात्मिक वस्तू आणि सेवा करातून केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या रूपाने 38,519 कोटी रुपये आणि राज्य वस्तू आणि सेवा कराच्या रुपाने 32,733 कोटी रुपये दिले. या नियमित परताव्यानंतर मे, 2024 मध्ये केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या रूपाने 70,928 कोटी रुपये आणि राज्य वस्तू आणि सेवा कराच्या रुपाने 72,999 कोटी रुपये एकूण महसुल जमा झाला. त्याचप्रमाणे, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मे 2024 पर्यंत केंद्र सरकारने जमा केलेल्या 154,671 कोटी रुपये निव्वळ एकात्मिक वस्तू आणि सेवा करातून केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या रुपात 88,827 कोटी रुपये आणि राज्य वस्तू आणि सेवा कराच्या रुपात 74,333 कोटी रुपये दिले. हे नियमित परताव्यानंतर, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये, मे 2024 पर्यंत केंद्रीय वस्तू आणि सेवा कर रुपात 1,65,081 कोटी रुपये आणि राज्य वस्तू आणि सेवा कर रुपात 1,68,137 कोटी रुपये एकूण महसुल जमा झाला.