मुंबई । महाराष्ट्रात ऐन उन्हाळ्यात काही भागात अवकाळीचं सावट आहे.आज हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील पुणे,सोलापूर,सांगली,सातारा,नांदेड लातूर,धाराशिव हिंगोली या जिल्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना आणि वादळी वारा (वेग ३०-४० कि मी प्रति तास) इशारा देण्यात आला आहे.
नागपुरात मुसळधार पाऊस
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज सकाळच्या सुमारास नागपुरात मुसळधार पाऊस पडत आहे. सकाळी 9.45 वाजल्याच्या सुमारास संपूर्ण अंधार पडलेला होता. जणू सांयकाळ झाल्या सारखे भासत होते. वाहन चालकांना आपल्या वाहनाचे हेड लाईट सुरू करून वाहन चालवावे लागत होते. शहरात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असून नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांना देखील फटका बसला आहे.
Damini App : वीजेपासून बचावासाठी वरदान ‘दामिनी’ ॲप
उन्हाळा वाढलाय…तब्येत सांभाळा…!
भांडी घासताना स्पंजचा वापर करताय? मग हे नक्की वाचा…
सावधान! बालविवाह केल्यास वऱ्हाडींसह सर्वांना खावी लागेल जेलची हवा