हुबालवाडीतील ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती
शेतकऱ्यांनी मानले निशिकांत भोसले-पाटील यांचे आभार
सांगली । हुबालवाडी (ता.वाळवा) येथील ओढ्यावरील ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्ती झाला होता.त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याप्रश्नी संबधीत प्रशासन लक्ष देत नसल्याने येथील शेतकऱ्यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन केले. त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना फोन लावून हा प्रश्न मार्गी लावला. निशिकांतदादा हे शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व असल्याची भावना शेकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.
हुबालवाडी येथील ओढ्यावरील ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्ती झाला होता.चार दिवसांपासून येथील शेतकरी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधत होते. परंतु या प्रश्नी कोणीही लक्ष देत न्हवते. ऐन उन्हाळ्यात लाईट मिळत नसल्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न व शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने पिके वाळून चालली होती. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे त्यांना आवाहन केले. त्यांनी या प्रश्नांची तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला. तात्काळ ट्रान्स्फॉर्मर दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर काही तासातच ट्रान्स्फॉर्मर दुरुस्ती करण्यात आला. हा प्रश्न मार्गी लागल्याने संबंधित शेकऱ्यांनी निशिकांतदादां पाटील यांचे आभार मानले.
यावेळी संतोष हुबाले,महादेव हुबाले,कृष्णराव नांगरे,धीरज हुबाले,सोपान हुबाले,श्रीकांत हुबाले,धनाजी हुबाले,सुभाष हुबाले,तानाजी नांगरे,अरुण हुबाले, उत्तम हुबाले आदी शेतकरी उपस्थित होते.
हुबालवाडीत एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्हची चर्चा…
हुबालवाडीतील ट्रान्स्फॉर्मर ना दुरुस्ती झाल्याने जनावरांसह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत संबधीत शेतकऱ्यांनी वीज वितरण कार्यालयाशी संपर्क केला होता. परंतु तेथील अधिकारी त्यांना दाद देत न्हवते. १०-१५ दिवस लागतील असे त्यांच्याकडून सांगण्यात येत होते.परंतु निशिकांतदादांनी हा प्रश्न एका फोनमध्ये काही तासात मार्गी लावल्याने एक कॉल प्रोब्लिम सॉल्व्हची चर्चा दिवसभर गावात सूरु होती.