नवी दिल्ली । रविवारी मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये आकाशात UFO (अज्ञात उडणारी वस्तू) दिसल्याचा दावा करण्यात आला.त्यानंतर हा UFO शोधण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या राफेल लढाऊ विमानांनी उड्डाण केले.तथापि, UFO बद्दल काहीही सापडले नाही.यूएफओमुळे इंफाळ विमानतळावरील हवाई सेवा बराच काळ विस्कळीत झाली होती.हवाई दलही या घटनेची चौकशी करत आहे.
एका वृत्तानुसार, रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास इंफाळ विमानतळाच्या आसपास यूएफओ दिसला.त्यामुळे इंफाळ विमानतळावरील व्यावसायिक विमानसेवेवरही परिणाम झाला.भारतीय हवाई दलाला UFO दिसल्याची माहिती मिळताच राफेल लढाऊ विमानाने UFO शोधण्याच्या उद्देशाने जवळच्या एअरबेसवरून उड्डाण केले.तथापि,खूप प्रगत सेन्सर असूनही आणि बराच वेळ उड्डाण करूनही,UFO चा मागोवा घेता आला नाही.नंतर हे लढाऊ विमान एअरबेसवर परतले.
यानंतर आणखी एक फायटर विमानानेही उड्डाण घेतले पण तरीही यूएफओचा काहीही पत्ता लागला नाही.हवाई दलाने सांगितले की,इम्फाळ विमानतळावर UFO पाहिल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ देखील आहे,ज्याचा हवाई दल आणि संबंधित तपास यंत्रणा तपास करत आहेत हवाई दलाने सांगितले की, UFO ची माहिती मिळताच हवाई संरक्षण प्रतिसादाचा भाग म्हणून लढाऊ विमाने पाठवण्यात आली.पश्चिम बंगालमधील हाशिमारा एअरबेसवरून लढाऊ विमानांनी उड्डाण केले.