सांगली । वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करून अपघात टाळावेत.आपल्या हलगर्जी व बेफिकीरीने आपले किंवा दुसऱ्याचे कुटुंब उध्वस्त होणार नाही याची काळजी घ्या,असे आवाहन राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी केले.इस्लामपूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे प्रामुख्याने उपस्थित होते.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गाडीतळ परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना कापडाचे रिप्लेकटर लावण्यात आले.याप्रसंगी प्रतिकदादा पाटील व संजय हारुगडे यांनी वाहनधारकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील,चिफ इंजिनिअर विजय मोरे, सुरक्षाधिकारी विरसेन गायकवाड,केनयार्ड सुपरवायझर विजय कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते.
संजय हारुगडे म्हणाले,प्रत्येक वाहनधारकांने कापडी रिप्लेकटर लावायला हवेत.अन्यथा कडक कारवाई केली जाईल.प्रत्येकाने नियमांचे पालन करून अपघात टाळावेत.वाहन चालविताना आपल्या घरी आपले कुटुंब वाट पहात आहे,याची कायम जाणीव ठेवा.मोठ्या आवाजात गाणी लावू नका एकही अपघात होऊ नये,यासाठी आपल्या कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील जागृत आहेत.आपणही कायम सजग व जागृत रहा.
प्रारंभी मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.याप्रसंगी पोलीस खात्याचे अमर जंगम,अभिजित पाटील,सतिश खोत,चंद्रकांत वंजारी,सुहास चव्हाण,तसेच कारखान्याच्या शेती विभागा तील सुनील यादव,रवि बुधावले,हेमंत पाटील व वाहनधारक उपस्थित होते. केनयार्ड सुपरवायझर विजय कुलकर्णी यांनी आभार मानले.