सातारा । ऊसदर प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून आज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाठार (ता. कराड) जवळ कृष्णा कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक करणारी वाहने रोखून धरली आहेत.त्यामुळे कृष्णा कारखाना – वाठार रस्त्यावरील वाहतूक कोलमडून पडत आहे.
या आंदोलनात बळीराजा शेतकरी संघटना व रासप सह अन्य संघटनाही सहभागी झाल्या आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेले ऊसदर आंदोलन चिघळले आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत ठीकठिकाणी ऊस वाहतूक रोखून धरली आहे.काही वाहनांच्या टायरमधील हवा सोडली जात आहे.तर काही ठिकाणी ऊस तोडी बंद पाडल्या जात आहेत.त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेती अधिकाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत.संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कालपासून अनेक ठिकाणी ऊसाने भरलेली वाहने रोखून धरली आहेत.मागील हंगामातील 400 रुपये आणि चालू हंगामातील 3 हजार 500 रुपये दर मिळावा यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम असून संघटनेने सोमवारपासून अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे.कोल्हापूर,सांगली जिल्ह्यास आता सातारा जिल्ह्यातही ऊसदर आंदोलनाने उचल खाल्ली आहे.
हेही वाचा – कुठं गेलं पैसं,हिशोब करा…का आमच्यावर…?; शंकरअण्णांची रोखठोक भूमिका व्हायरल
‘स्वाभिमानी’ सह बळीराजा शेतकरी संघटना व रासप सह अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळपासूनच वाठार- रेठरे बुद्रुक रस्त्यावर जाई मोहिते प्रशालेजवळय यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडे जाणारी 40 बैलगाडी व 50 हुन अधिक ट्रॅक्टर रोखून धरले आहेत.संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ऊसाने भरलेले अनेक ट्रॅक्टर अडवले आहेत.यामुळे वाहतूक व्यवस्था पुर्ण कोलमडून गेली.
यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांच्याशी चर्चा झाली,जोपर्यंत ऊस आंदोलनाचा तोडगा निघत नाही तोपर्यंत वाहतूक सोडणार नाही अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भुमिका मांडली. काल (बुधवारी) बहे तांबवे पुलाजवळ ऊस वाहतूक रोखली होती.जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत वाळवा तालुक्यातील ऊसबंद ठेवु असे आश्वासन कारखाना प्रशासनाने दिले होते.यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेने या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.याठिकाणी कराड पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आला आहे.
हेही वाचा – सांगली,कोल्हापूर जिल्ह्यात ऊस गाळपाची चाके मंदावली; ऊसदर आंदोलनाचा फटका
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष देवानंद पाटील,कराड तालुकाध्यक्ष बापुसाहेब साळुंखे,उत्तम साळुंखे.रामचंद्र साळुंखे,वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव सतिश यादव,शिवाजी पाटील, उत्तम पाटील,भिकशेठ तोडकर,तानाजी गावडे,प्रदीप पाटील दादासाहेब यादव,प्रमोद जगदाळे, अर्जुन साळुंखे,दिलीप गोंदकर तसेच बळीराजाचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील,जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव,युवा अध्यक्ष गणेश शेवाळे,महेश जिरंगे विशाल बडेकर आदींसह संघटसनेचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
शेतकरी भावांनो, ऊसतोडी घेऊ नका…
यावर्षी सांगली जिल्ह्यात तासगाव,नागेवाडी,मानगंगा,डफळापुर,हे चार साखर कारखान्याने नव्यावे चालु होणार आहेत.यंदा कमी पर्जन्यमान असल्याने साखर कारखाने 80 ते 85 दिवस चालणार आहेत.साखर कारखान्याकडे ऊस उपलब्ध नाही.दहा वर्षांमध्ये यंदा उसाचे उत्पन्न कमी आहे.त्यामुळे कारखानदारांना अद्दल घडवण्याची हीच वेळ आहे.शेतकऱ्यांनी ही संधी सोडू नये.तरी शेतकऱ्यांनी ऊसतोड घेऊ नये. त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी चांगला भाव मिळेल.
देवानंद पाटील व भागवत जाधव
स्वाभिमानी शेतकरी संघटना