पुणे | राज्यभरातील ज्या उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली आहे.त्या उमेदवारांना आजपासून उत्तरतालिका ऑनलाइन पाहण्याची सुविधा झाली आहे.त्यांना 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत उत्तरपत्रिका पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.उत्तरपत्रिका पाहण्यासाठी संबंधित उमेदवादारांच्या ऑनलाइन लॉगइनमध्ये सोय करण्यात आली आहे.उमेदवारांना काही हरकत असल्यास ती परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे नोंदविताही येणार आहे.
तलाठी भरती परीक्षा पार पडल्यानंतर आता भूमी अभिलेख विभागाकडून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आता परीक्षा दिलेल्या उमेदवारांना उत्तरतालिका पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे.त्यानुसार आता परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अॅन्सर की (उत्तर तालिका) पाहण्यासाठी सोय उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
तलाठी भरती Response Sheet Shift Wise Upload होण्यास सुरुवात झालेली आहे.
उत्तरे पाहिल्यानंतर उमेदवारांना काही शंका,आक्षेप हरकत असल्यास परीक्षा घेतलेल्या टीसीएस कंपनीकडून लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याकरिता आक्षेप अथवा हरकत नोंदवण्यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.आक्षेप योग्य असल्यास ही रक्कम संबंधित उमेदवाराला परत केली जाणार आहे. मात्र, आक्षेप अयोग्य असल्यास 100 रुपये शुल्क परत केले जाणार नाही. तसेच उमेदवारांकडून नोंदविण्यात आलेले आक्षेप टीसीएस कंपनीच्या समितीकडे जातील. या समितीकडून प्राप्त आक्षेपांचे निरसन केले जाणार आहे,अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि तलाठी भरती परीक्षेचे समन्वयक आनंद रायते यांनी दिली.
तलाठी भरतीची परीक्षा एकुण 57 सत्रामध्ये घेणेत आलेली आहे.सदर 57 सत्राची काठिण्य पातळीचे समीकरण (Normalization) करण्यात येणार आहे.TCS कंपनीकडून करण्यात येणाऱ्या Normalization सुत्राची माहिती यापूर्वीच प्रसिध्द करणेत आलेला आहे Normalization अंती उमेदवारांचे गुण निश्चित करून राज्याची मेरिट लिस्ट प्रसिध्द करण्यात येणार आहे.
तलाठी उत्तरतालिका 2023 कशी डाउनलोड करावी?
तलाठी उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.
✪ सर्वप्रथम ईमहाभूमीच्या अधिकृत संकेतस्थळ mahabhumi.gov.in ला भेट द्या.
✪ तिथे तलाठी सरळसेवा भरती 2023 या टॅब वर क्लिक करा.
✪ आता ऑनलाईन लिंक वर क्लिक करा
✪ नवीन पेज ओपन होईल तिथे तलाठी भरती 2023 फॉर्म भरतांना मिळालेला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
✪ तेथे रिस्पॉन्स शीट वर क्लिक करा.
✪ आता तुम्ही तलाठी उत्तरतालिका 2023 डाउनलोड करू शकता.
तलाठी उत्तरतालिकेवर आक्षेप कसा घ्यावा?
तलाठी उत्तरतालिका 2023 वर काही आक्षेप असल्यास उमेदवार 08 ऑक्टोबर 2023 पर्यंत अक्षेप घेऊ शकतात. तलाठी आक्षेप घेण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करू शकतात.
🌑 सर्वप्रथम ईमहाभूमीच्या अधिकृत संकेतस्थळ mahabhumi.gov.in ला भेट द्या.
🌑 तिथे भरती या टॅब वर क्लिक करा.
🌑 आता ऑनलाईन लिंकवर क्लिक करा
🌑 नवीन पेज ओपन होईल तिथे तलाठी भरती 2023 फॉर्म भरतांना मिळालेला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
🌑 आता Response Sheet या सेक्शन मध्ये जाऊन Objection वर क्लिक करा.
🌑 ज्या प्रश्नावर आक्षेप घ्यायचा असेल त्याचा ID निवडा व पुरावा अपलोड करून 100 रुपये एवढे शुल्क (प्रति आक्षेप/हरकती) भरा व आक्षेप घेण्याची प्रक्रिया पूर्ण करा.