90 पदाधिकार्यांच्या कार्यकारिणीची घोषणा
सांगली । जिल्हा भाजपा ग्रामीण जिल्हा कार्यकारीणी,जिल्हा कोअर कमिटी, जिल्हयातील 15 मंडल अध्यक्ष,जिल्हा युवा व महिला मोर्चा अध्यक्षासह सात मोर्चा अध्यक्ष अशी जंबो कार्यकारीणी,भाजपाचे जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्हयाचे पालकमंत्री ना. सुरेश खाडे,खा.संजय पाटील आदी सह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर केली.
यावेळी भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, सांगली जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, राजाराम गरूड,माजी आमदार दिनकर पाटील,सांगली लोकसभा प्रभारी दिपक शिंदे, सांगली शहर भाजपाचे अध्यक्ष प्रकाश ढंग,सांगली जिल्हा सरचिटणीस मिलिंद कोरे,परशुराम नागरगोजे,धैर्यशील मोरे,चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपा जिल्हा कार्यकारीणी 90 पदाधिकार्यांची जाहिर करण्यात आली असुन यामध्ये 10 उपाध्यक्ष पुढीलप्रमाणे जयराज पाटील (कामेरी),प्रमोद शेंडगे(तासगाव), संजय येसुगडे (पलुस), माणिक मोरे (देवराष्ट्रे), अरविंद तांबवेकर(हरिपुर),सुरेंद चौगुले (अंकलखोप), राजाराम आवळे (दुधगाव),महिलांमध्ये विद्या पाटील (सागाव),आशाताई पवार (इस्लामपुर), स्नेहल पाटील (कवठे महांकाळ),सरचिटणीस 4 यामध्ये मिलिंद कोरे (कवठेमहांकाळ), सुनिल पाटील (विसापुर),मंगेश टिके (सागाव), डाॅ. सरिता कोरबु (मिरज), चिटणीस 10 यामध्ये विलास काळेबाग(खरसुंडी),स्वप्निल पाटील (सावर्डे),सुहास पाटील (खानापुर),संजय घोरपडे (रेठरेधरण), राजकुमार सलगर (करगणी),परशुराम नागरगोजे (बेडग), किशोर डोंबे (विटा), वर्षाराणी हुबाले (कासेगाव), प्राजक्ता कोरे (विजयनगर), वसुधा दाभोळे (पेठ), कोषाध्यक्ष राहुल सकळे (नांद्रे) तर 64 सदस्यांची निवड करण्यात आलेली आहे.या 64 सदस्यांमध्ये 20 महिला सदस्यांना संधी देवुन महिलांचाही सन्मान करण्यात आला आहे.
सांगली जिल्हयामध्ये 15 मंडलची रचना असुन यामध्ये प्रामुख्याने मंडलनिहाय अध्यक्ष पुढील प्रमाणे : मिलींद पाटील(पलुस),अशोक साळुंखे (कडेगाव),प्रमोद सावंत (जत),सुनिल जाधव(तासगाव ग्रामीण), हणमंत पाटील(तासगाव शहर),जनार्दन पाटील (कवठेमहांकाळ),नवनाथ पाटील(विसापुर सर्कल), अशोकराव खोत(इस्लामपुर शहर), निवास पाटील(वाळवा ग्रामीण),हणमंतराव पाटील(शिराळा),डाॅ. सचिन पाटील(वाळवा पश्चिम),दिनकर भोसले(मिरज ग्रामीण),दत्तात्रय तारळकर(विटा शहर),प्रमोद भारते (खानापुर),जयवंत सरगर(आटपाडी)यांची मंडल अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली तर भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी डाॅ. उषाताई दशवंत (शिराळा),भाजपा जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष पदी राजाराम गरूड (कडेपुर),भाजपा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष पदी अनिल पाटील (आटपाडी),भाजपा जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष पदी प्रकाश गढळे (आमनापुर),भाजपा जिल्हा अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष पदी विद्याधर कांबळे(सलगरे),भाजपा जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष आझम मकानदार (कवठेमहांकाळ) आदी पदाधिकार्यांच्यावर विविध मोर्चाची जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.
सांगली जिल्हा कोअर कमिटीमध्ये मंत्री ना. सुरेश खाडे,खा. संजय पाटील,आ.सुधिर गाडगीळ,आ.गोपिचंद पडळकर,माजी आ. सुरेश हळवणकर(जिल्हा प्रभारी),पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील,माजी आ.विलासराव जगताप,राजेद्र देशमुख, पृथ्वीराज देशमुख,सी.बी.पाटील,हातकणंगले लोकसभा निवडणुक प्रमुख सत्यजीत देशमुख,सांगली लोकसभा निवडणुक प्रमुख दिपक म्हैशाळकर शिंदे, सांगली लोकसभा प्रभारी शेखर इनामदार,विधानसभा निवडणुक प्रमुख संग्रामसिंह देशमुख,अमरसिंह देशमुख,प्रभाकर पाटील,तमन्नगौंडा रवीपाटील,सम्राट महाडिक,मोहन वनखंडे आदीसह जिल्हयातील प्रमुख पदाधिकारी यांना कोअर कमीटीमध्ये संधी देण्यात आली आहे.
भाजपाचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता हा एका विचाराने सांगली जिल्हयामध्ये काम करेल. भविष्यातील निवडणुकामध्ये भाजपा पक्षाला चांगले यश मिळणार आहे.2024 ला पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील या दृष्टीने प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता गेल्या 10 वर्षातील मोदी सरकारचे काम घराघरात पोहचवुन खर्या अर्थाने देशसेवकाचे कर्तव्य पार पाडेल असा विश्वास भाजपाचे जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील(दादा) यांनी निवडी दरम्यान व्यक्त केला.